Ratnagiri Lockdown : रत्नागिरीत 8 दिवस अत्यंत कडक लॉकडाऊन, दूध, किराणाही घरपोच मागवा!

रत्नागिरी जिल्ह्यात तर 2 जूनपासून 8 दिवस जिल्हा बंद असणार आहे. रत्नागिरीकरांना दूधही घरपोच मागवावं लागणार आहे.

Ratnagiri Lockdown : रत्नागिरीत 8 दिवस अत्यंत कडक लॉकडाऊन, दूध, किराणाही घरपोच मागवा!
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 8:02 PM

रत्नागिरी : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यामुळे लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आलीय. असं असलं तरी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र कडक निर्बंध लागू असणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात तर 2 जूनपासून 8 दिवस जिल्हा बंद असणार आहे. रत्नागिरीकरांना दूधही घरपोच मागवावं लागणार आहे. 2 जून ते 8 जून पर्यंत जिल्ह्यात कडक नियम लागू असणार आहेत. तशी घोषणा जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आलीय. (Ratnagiri Lockdown milk and groceries will be available only home delivery)

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजारानेही डोकं वर काढलंय. अशातच कोकणात आर्द्रता जास्त असल्यामुळे कोकणवासियांना म्युकरमायकोसिसचा धोका अधिक असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. अशावेळी कोरोना बाधित रुग्णांची साखळी तोडण्यासाठी 2 जून रोजी सकाळी 7 पासून 8 जून रोजी सकाळी 7 पर्यंत कडक निर्बंध लागू असणार आहेत. तसे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेत.

रत्नागिरी जिल्ह्यात काय सुरू, काय बंद?

1. औषधी दुकाने, आरोग्य विषयक सेवा आणिआरोग्य विषयक आस्थापना पुर्णवेळ सुरु राहतील. 2. दूध आणि किराणा मालाची दुकाने यांना केवळ घरपोच सेवा सकाळी 7 ते 11 या वेळेत देता येणार. 3. कोणत्याही प्रकारचे दुकान / आस्थापना पुर्णतः बंद राहतील. 4. रत्नागिरी जिल्ह्याच्या सिमा अन्य जिल्हयातून प्रवेश करणेस किंवा अन्य जिल्ह्यात प्रवास करणेस बंद राहतील. 5. केवळ नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी, वैदयकिय उपचारासाठी आणि कोव्हीड-19 व्यवस्थापनासाठी अत्यावश्यक सेवा किंवा निकडीच्या, आणीबाणीच्या प्रसंगी रत्नागिरी जिल्हयात प्रवेश किंवा जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यात प्रवास करण्यास मुभा राहील. 6. रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस 48 तास अगोदर केलेली कोव्हीड-19 निगेटिव्ह चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक 7. मालवाहतुकीसाठी कोणतेही बंधन असणार नाही. मालवाहतुक केवळ दुकानापर्यंत / आस्थापनेपर्यंत माल वितरण करणेपुरती मर्यादित राहील. 8. कोणत्याही ग्राहकास थेट माल पुरवता येणार नाही. याबाबत नियमांचा भंग आढळल्यास अशा मालवाहतुकदाराची सेवा कोव्हीड-19 चा प्रादुर्भाव आटोक्यात येईपर्यंत बंद करण्यात येणार. 9. पेरणीचा हंगाम विचारात घेता कृषिविषयक संलग्न सर्व दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 या काळात सुरु राहणार.

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच

रत्नागिरी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लागू आहे. असं असलं तरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना पाहायला मिळत नाही. संचारबंदीच्या काळातही कोरोना रुग्णांची आकडेवारी जैसे थेच असल्याचं पाहायला मिळत आहे. रविवारी जिल्ह्यात 494 नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते तर 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. या परिस्थितीत जिल्ह्यातील कोरोना चाचणीचा आकडाही वाढवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊन शिथिल केला असला तर रत्नागिरी जिल्ह्यातील लॉकडाऊन कामय ठेवण्यात आलाय.

संबंधित बातम्या :

मुक्त संचार केला तर निर्बंध अधिक कडक करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मुंबईकरांना इशारा

Pune Lockdown Update : पुण्यातील लॉकडाऊन शिथिल, सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सर्व प्रकारची दुकाने सुरु

Ratnagiri Lockdown milk and groceries will be available only home delivery

महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....