Rusia Ukraine War | ‘युक्रेनच्या युद्धाचा अनुभवलेला थरारक प्रसंग, तो क्षण आठवला की मन हेलावतं’
चार दिवस उपाशी, विद्यापीठात शिकायला गेलेल्या ठिकाणी मिसाइल (Missile) हल्ला, आपण घरी जाऊ की नाही याची शाश्वती नाही, अशा बिकट परिस्थितीतून रत्नागिरीतील (Ratnagiri) मुस्कान सोलकर (Muskan Solkar) ही मुलगी युद्धभूमीतून रत्नागिरीत परतली.
चार दिवस उपाशी, विद्यापीठात शिकायला गेलेल्या ठिकाणी मिसाइल (Missile) हल्ला, आपण घरी जाऊ की नाही याची शाश्वती नाही, अशा बिकट परिस्थितीतून रत्नागिरीतील (Ratnagiri) मुस्कान सोलकर (Muskan Solkar) ही मुलगी युद्धभूमीतून रत्नागिरीत परतली. भितीच्या छायेत भारतात आणि आपल्या घरी परत येण्याची ओढ मुस्कानला मायदेशी घेवून आलीच. पण युद्धभुूमीत असताना जगण्या-मरण्याचा संघर्ष करतानाचा तो क्षण मुस्कानचे मन अजूनही हेलावून टाकतो. क्षेपणास्त्र डोळ्यासमोर आपल्या विद्यापीठाच्या आवारात पडताना पाहिलयानंतर मनातील काहूर आजही मुस्कानच्या डोळ्यात पाहायला मिळतो. युद्धभूमीतला मुस्कानचा हा सारा थरारक अनुभव काय होता हे तिच्याकडून जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. यावेळी तिच्यासह अनेक भारतीय विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान, अडकलेले इतर विद्यार्थीही लवकर सुटले जावेत, अशी अपेक्षा व्यक्त होतेय.