Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने उत्तर देण्याची वेळ आलीये; वरूण सरदेसाई यांचा सरकारवर हल्लाबोल

Varun Sardesai on Maratha Reservation : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवा सेना सचिव वरूण सरदेसाई रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं. मंत्रिमंडळ विस्तारावरूनही वरून सरदेसाई यांनी युती सरकारला टोला लगावला आहे.

Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने उत्तर देण्याची वेळ आलीये; वरूण सरदेसाई यांचा सरकारवर हल्लाबोल
Follow us
| Updated on: Oct 14, 2023 | 4:14 PM

मनोज लेले, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, रत्नागिरी | 14 ऑक्टोबर 2023 : मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. जालन्यातील अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांची सभा झाली. यात त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते, युवा सेना सचिव वरूण सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाच्या आरक्षण संदर्भात सरकारला आता उत्तर देण्याची वेळ आली आहे. मराठा समाजाला जी काही आश्वासन दिली होती. त्याच्याबरोबर उलट आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये जाऊन आश्वासन दिलं. त्यामुळे मराठा आरक्षणावर आता उपमुख्यमंत्री यांनी बोलावं, असं वरूण सरदेसाई म्हणाले.

वरूण सरदेसाई रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघाची विधानसभा मतदारसंघानुसार बैठका ते घेत आहेत. कोकण पदवीधर मतदार संघाची जबाबदारी वरूण सरदेसाई यांच्यावर आहे. 7 जुलै 2024 मध्ये कोकण पदवीधर मतदार संघाची मुदत संपणार आहे. भाजपच्या ताब्यातील कोकण पदवीधर मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी वरूण सरदेसाई ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय.खासदार विनायक राऊत यांच्या कार्यालयात वरूण सरदेसाई यांनी पदाधिकाऱ्यासोबत बैठक घेतली. तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

गेली एक सव्वा वर्ष अनेक लोक जॅकेट नवीन घेऊन बसलेत. बुटांना पॉलिश करून बसलेत. त्यामुळे सरकार आता कंत्राटी पद्धतीने मंत्रिपद देणार का? मंत्रिमंडळ विस्तार होईल तेव्हा आपण बोलू. नाहीतर शोले चित्रपटाप्रमाणे कब है होली, कब है होली त्याप्रमाणे कब है मंत्रिमंडळ विस्तार अशी विचारण्याची वेळ येईल, असं म्हणत वरूण सरदेसाई यांनी युती सरकारला टोला लगावला आहे.

कोकण दौऱ्यावरही त्यांनी भाष्य केलं. कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही टेक्निकल आहे. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कोकणात आलो आहे. तरुणांच्या बेरोजगारीकडे राज्य सरकारने गांभीर्याने पाहावं, असंही वरूण सरदेसाई म्हणाले.

उत्सव साजरा करण्याची परंपरा सगळीकडेच आहे. इव्हेंट साजरा करून कोणाचा बुरुज ढासळत नाही. मुंबई आणि महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला आहे. भाजपने दांडियाचं आयोजन केलं असेल तर त्यांनी ते करावं. त्याचा काहीही परिणाम होणार नाही, असंही वरूण सरदेसाई म्हणाले.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.