Nilesh Rane : रत्नागिरी-सिंधुदुर्गातून किरण सामंत यांना उमेदवारी दिल्यास निलेश राणे यांचं काय?

Nilesh Rane : रत्नागिरी-सिंधुदुर्गातून लोकसभा मतदारसंघावरुन शिवसेना-भाजपामध्ये संघर्ष होऊ शकतो. शिवसेना शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहेत. नारायण राणे सुद्धा या मतदारसंघातील वजनदार नेते आहेत.

Nilesh Rane : रत्नागिरी-सिंधुदुर्गातून किरण सामंत यांना उमेदवारी दिल्यास निलेश राणे यांचं काय?
nilesh rane
Follow us
| Updated on: Aug 30, 2023 | 8:05 AM

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरु केली आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीला आता फक्त काही महिने उरले आहेत. शिवसेना (शिंदे गट), भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गट एकत्र आहेत. त्यांच्यासमोर काँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच आव्हान आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये अजून जागा वाटपाची बोलणी सुरु झालेली नाहीत. पण प्रत्येक पक्षाने संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरु केलीय. काही पक्ष आतापासूनच काही जागांवर दावा करत आहेत. प्रत्यक्ष जागा वाटचपाची चर्चा होईल, त्यावेळी या मुद्यारुन महायुती-महाआघाडीमध्ये धुसफूस होऊ शकते.

महाराष्ट्रातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरुन शिवसेना शिंदे गट आणि भाजपामध्ये अंतर्गत संघर्ष होऊ शकतो. रत्नागिरी-सिंधुदुर्गातून किरण सामंत यांच्यासाठी हालचाली सुरू आहेत. विविध संस्था आणि संघटनांच्या माध्यमातून किरण सामंत यांना उमेदवारी द्यावी, अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली जाणार आहे. किरण सामंत हे उदय सामंत यांचे सख्खे बंधू आहेत. सध्या ठाकरे गटाचे विनायक राऊत सिंधुदुर्ग रत्नागिरीचे लोकसभेवर प्रतिनिधीत्व करतात. किरण सामंत यांच्या नावाची चर्चा आहे.

नारायण राणे यांचा बालेकिल्ला

सध्या किरण सामंत हे रत्नसिंधू या शासकीय योजनेचे सदस्य म्हणून काम करत आहेत. या योजनेच्या माध्यमातून पर्यटन आणि मच्छिमार बांधवांसाठी मोठं काम केलं आहे. किरण सामंत यांचं नाव चर्चेत असलं, तरी या जागेवर भाजपाकडून सुद्धा दावा केला जाऊ शकतो. सध्या केंद्रात मंत्री असलेले नारायण राणे रत्नागिरी-सिंधुदुर्गातील वजनदार नेते आहेत. काही वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा नारायण राणे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. पण 2014 पासून त्यांचं वर्चस्व कमी होत गेलं. सर्वप्रथम निलेश राणे यांचा लोकसभा निवडणुकीत त्यानंतर नारायण राणे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. उदय सामंत काय म्हणाले?

मागच्या 10 वर्षांपासून विनायक राऊत रत्नागिरी-सिंधुदुर्गच लोकसभेवर प्रतिनिधीत्व करत आहेत. आज नारायण राणेंच्या रुपाने भाजपाकडे वजनदार नेता आहे. त्यामुळे भाजपाकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर दावा केला जाऊ शकतो. निलेश राणे यांचा मतदारसंघात चांगला जनसंर्पक आहे. त्यामुळे या जागेवरुन युतीमध्ये संघर्ष होऊ शकतो. “किरण सामंत हे माझे सख्खे भाऊ आहेत. मात्र त्यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार आहे. पण ते निवडणुकीला उभे राहिले, तर त्यांना तीन ते साडेतीन हजार मतांनी निवडून आणू” असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ते शिवसेना शिंदे गटामध्ये आहेत.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.