Gangakhed : रत्नाकर गुट्टे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, शांतता कमिटीच्या बैठकीच अशांतता करुन परतले, नेमके काय घडलं गंगाखेडमध्ये..!

रत्नाकर गुट्टे हे कायम चर्चेत असलेले आमदार आहेत.त्यांनी या कार्यक्रमाला लोकप्रतिनीधी म्हणून उपस्थिती दर्शवली होती. यावेळी त्यांनी शहरातील गणेश मंडळांना योग्य ते मार्गदर्शन करणे हे पोलिसांना अपेक्षित होते. मात्र, त्यांनी थेट पोलिसांच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पोलीस हे हाप्ते घेतात त्यांच्या या विधानाने पोलीस कर्मचारी संतप्त झाले होते.

Gangakhed : रत्नाकर गुट्टे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, शांतता कमिटीच्या बैठकीच अशांतता करुन परतले, नेमके काय घडलं गंगाखेडमध्ये..!
पोलीस हप्ते घेतात, या गुट्टेंट्या व्तकव्यावरुन कार्यक्रमात तणाव निर्माण झाला होता.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 6:15 PM

परभणी : राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेडचे (Ratnakar Gutte) आमदार रत्नाकर गुट्टे हे कायम चर्चेत राहिलेले आहेत. यापूर्वी शेतकऱ्यांचे नावे कर्ज घेतल्याचा आरोप करीत त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली होते. तर मध्यंतरी एका महिलेला मारहाण आणि विनयभंग केल्याप्रकरणी ते चर्चेत आले होते. आता गणेश उत्सवानिमित्त  (Gangakhed) शहरांमध्ये शांतता कमिटीच्या बैठका पार पडत आहेत. लोकप्रतिनीधी म्हणून त्यांना गंगाखेड येथील सार्वजनिक उत्सव समितीच्यावतीने आयोजित कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, (Police) पोलिसांनीच त्यांना निमंत्रण देऊन या कार्यक्रमात त्यांनी पोलिस हे हाप्ते घेतात, असे विधान केले आहे. त्यामुळे व्यासपीठावर काही काळ कूजबूज झाली पण कोणी काही आक्षेप घेतला नाही. त्यांच्या विधानाने शांतता कमिटीचा उद्देश राहिला बाजूला आणि त्यांच्याच विधानाची चर्चा रंगू लागली होती.

गुट्टेंच्या विधानानंतर तणाव..!

रत्नाकर गुट्टे हे कायम चर्चेत असलेले आमदार आहेत.त्यांनी या कार्यक्रमाला लोकप्रतिनीधी म्हणून उपस्थिती दर्शवली होती. यावेळी त्यांनी शहरातील गणेश मंडळांना योग्य ते मार्गदर्शन करणे हे पोलिसांना अपेक्षित होते. मात्र, त्यांनी थेट पोलिसांच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पोलीस हे हाप्ते घेतात त्यांच्या या विधानाने पोलीस कर्मचारी संतप्त झाले होते. शिवाय व्यासपीठावर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रनिक लोढा आणि इतर पोलीस कर्मचारी हजर होते. भर कार्यक्रमात यासंबंधी कोणी काही बोलले नसले तरी पोलीसांमध्ये तणाव निर्माण झाला होता.

गत निवडणुकीतील तो किस्सा पुन्हा चर्चेत

पोलीसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या गुट्टे यांनी गत निवडणुकीच्या काळातच मतदारांना थेट पैसे घेण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल ते किती जागृत आहेत आहेत याचा प्रत्यय आला होता. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकरणावरुन गुट्टे कायम चर्चेत राहिलेले आहेत. आता पोलीस प्रशासनाने आयोजित केलेल्या कार्यक्रमातच त्यांच्या कारभाराबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी केलेल्या या विधानाचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

शांतता कमिटीची बैठक

गणरायाचे आगमन दोन दिवसांवर आले आहे. या उत्सवादरम्यान शहरात शांतता रहावी आणि सार्वजनिक ठिकाणचे कार्यक्रम शांततेने पार पडावेत यासाठी या बैठकीचे आयोजन केले जात. शिवाय बैठकीला गणेश मंडळाचे अध्यक्ष, लोकप्रतिनीधी, प्रतिष्ठीत नागरिक आणि पोलीस प्रशासानातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित असतात. त्याच अनुशंगाने या कार्यक्रमाला रत्नाकर गुट्टे हे देखील उपस्थित होते. त्यांच्या अशा विधानाने पोलीस प्रशासानामध्ये मात्र, नाराजीचा सूर उटला होता.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.