ठाकरे सरकार पाडण्यासाठी नेमकं कोण भेटलं? कोण ‘टाईट’ करतंय? पहिल्यांदाच राऊतांनी फोडून सांगितलं?
जय महाराष्ट्र, अशी पत्रकार परिषदेची सुरुवात करून त्यांनी आपल्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे फोन आल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्रातले ठाकरे सरकार पाडण्यासाठी नेमकं कोण भेटलं, कोण 'टाईट' करतंय हे पहिल्यांदाच राऊतांनी सांगितले.
मुंबईः महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि अंगावर आलेल्या भाजपला थेट शिंगावर घेणारे शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज मंगळवारी दुपारी बरोबर चार वाजता शिवसेना भवन (Shivsena Bhavan) येथे सुरू केलेल्या पत्रकार परिषदेत एकामागून एक फटाके फोडयला सुरुवात केलीय. जय महाराष्ट्र, अशी पत्रकार परिषदेची सुरुवात करून त्यांनी आपल्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे फोन आल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्रातले ठाकरे सरकार पाडण्यासाठी नेमकं कोण भेटलं, कोण ‘टाईट’ करतंय हे पहिल्यांदाच राऊतांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला शिवसैनिकांनी तोबा गर्दी केलीय. विशेषतः नाशिकमधून वाहने भरून शिवसैनिक मुंबईला रवाने झालेत. महाराष्ट्रातून अनेक शिवसैनिक मुंबईत पोहचलेत.
काय म्हणाले राऊत?
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, माझ्यासारख्या राज्यसभा सदस्याला केंद्रीय तपास यंत्रणांचे लोक का त्रास देत आहेत, असा प्रश्न करून त्याचे उत्तर दिले. ते म्हणाले, भाजपचे काही प्रमुख लोक मला तीनदा भेटले. वारंवार मला हेच सांगितले की, तुम्ही या सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडा. कोणत्याही परिस्थिती आम्हाला हे सरकार घालवायचं. आमची सगळी तयारी झालेय. काही आमदार आमच्या हाताला लागलेत. तुम्ही बाहेर पडा. आम्हाला मदत करा. आम्ही राष्ट्रपती राजवट आणू. म्हटलं हे कसं शक्यय? याच्यावर त्यांनी सांगितलं की, तुम्ही जर मदत केली नाही, तर केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईट करेल, असा दावाही त्यांनी केला.
धाडी का पडतायत?
शिवसेना खासदार संजय राऊत पुढे म्हणाले की, सध्या पवार कुटुंबीयांवर धाडी पडत आहेत. त्यांनाही आम्ही टाईट करतोय. मग मी माहिती घेतली की, त्यानंतर सातत्यानं धाडी पडू लागल्या. ईडीची लोकं त्यांच्या पवारांच्या घरात ठाण मांडून बसले. त्यांना धमकावलं. मी जेव्हा त्यांना सांगितलं की, तुम्ही या भानगडीत पडू नका. आम्ही प्रतिकार करू. प्रतिकार करण्याचा प्रयत्न झाला, तर महाराष्ट्रात ठिणगी पडेल. तर त्यानंतर माझ्यावर आणि माझ्या आसपासच्या लोकांवर ईडीच्या धाडी सुरू झाल्या. अत्यंत वाईट पद्धतीनं पहाटे चार व तीन वाजता धाडी पाडल्याचे त्यांनी सांगितले.
इतर बातम्याः
Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!