Raut on Hedgewar: सरसंघचालक हेडगेवारांनी सुभाषबाबूंना भेट नाकारली; ऊर्जा मंत्री नितीन राऊतांचा वादग्रस्त दावा

सरसंघचालक हेडगेवार यांनी1930 मध्ये यवतमाळ जिल्ह्यात जंगल सत्याग्रह केला. आता करळगाव येथील जंगलात संग्रहालय उभारण्यात येणार आहे. याच पाश्वभूमीवर ऊर्जामंत्री राऊत यांनी वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

Raut on Hedgewar: सरसंघचालक हेडगेवारांनी सुभाषबाबूंना भेट नाकारली; ऊर्जा मंत्री नितीन राऊतांचा वादग्रस्त दावा
नेताजी सुभाष चंद्र बोस आणि केशव बळीराम हेडगेवार.
Follow us
| Updated on: Jan 25, 2022 | 1:44 PM

यवतमाळः ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सुरू असलेली एकामागून एक वादग्रस्त राजकीय वक्तव्ये थांबायला तयार नाहीत. गेल्या आठ दिवसांपासून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजकीय वादाची पेटविवलेली लड अजून शमते न शमते तोच आता ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनीही त्यात उडी घेतल्याचे दिसते आहे. त्यांनी सरसंघचालक केशव बळीराम हेडगेवार (Keshav Hedgewar) यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji SubhashChandra Bose) यांना भेट नाकारली होती, असा वादग्रस्त दावा केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा एकदा राज्यात वादाची ठिणगी पडणार असल्याची चिन्हे आहेत. यावरून भाजप पुन्हा एकदा आक्रमक होऊ शकतो.

नेमके काय म्हणाले राऊत?

यवतमाळ येथे एका कार्यक्रमाला आले असता ऊर्जा मंत्री नितीन राऊत म्हणाले की, नाशिक येथे सरसंघचालक केशव बळीराम हेडगेवार हे मुक्कामी होते. तेव्हा सुभाषचंद्र बोस यांनी त्यांच्या भेटीच्या निमित्ताने आपल्या खासगी सचिवाला पाठवले. मात्र, हेडगेवार यांनी ब्रिटीश आपल्याला अटक करतील या भीतीने भेट नाकारली. असा दावा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वणी येथील कार्यक्रमात बोलताना केला.

तेच गुलाम शिकवायला निघाले

राऊत पुढे म्हणाले की, यांनीच जाती-जातीत भांडण तंटे उभे केले. आता तेच गुलाम लोक आज शिकवायला निघाले आहेत. सरसंघचालक हेडगेवार यांनी1930 मध्ये यवतमाळ जिल्ह्यात जंगल सत्याग्रह केला. आता करळगाव येथील जंगलात संग्रहालय उभारण्यात येणार आहे. याच पाश्वभूमीवर ऊर्जामंत्री राऊत यांनी वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

वाद का पेटणार?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष केले आहे. आता ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी भाजपची मातृसंस्था असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला या वक्तव्यातून लक्ष केले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजप या वक्तव्यावरून आक्रमक होणार हे निश्चित.

नाशिक येथे सरसंघचालक हेडगेवार हे मुक्कामी होते. तेव्हा सुभाषचंद्र बोस यांनी त्यांच्या भेटीच्या निमित्ताने आपल्या खासगी सचिवाला पाठवले. मात्र, हेडगेवार यांनी ब्रिटिश आपल्याला अटक करतील या भीतीने भेट नाकारली. – नितीन राऊत, ऊर्जा मंत्री

इतर बातम्याः

Nashik MHADA | म्हाडा भूखंडात कोट्यवधींचा घोटाळा; मंत्री आव्हाडांचा सलग 2 ट्वीटमधून बॉम्बगोळा!

Nashik | ऑनलाईन शिक्षणाने मारले, 11 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; 2 महिन्यांतली तिसरी घटना

National Children’s Award | 14 किलोमीटर खाडी 4 तास 9 मिनिटांत पोहून पार; ‘स्वयंम’च्या यशाने पंतप्रधानही भारावले…!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.