तर फडणवीसांचं 90 टक्के मंत्रीमंडळ रिकामं होईल – संजय राऊत

महायुती सरकारच्या मंत्र्याचा शपथविधी काल पार पडला, मात्र त्यामध्ये राज्यातील अनेक ताकदवान नेत्यांना वगळण्यात आलं, मंत्रीपद देण्यात आलंच नाही, त्यावरून राऊतांनी टोला लगावत महायुती सरकारवर टीका केली. जे आमच्याकडून सोडून गेले ते सत्ता, पद आणि पैसा या मोहासाठी गेलेत. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे, अकार्यक्षमतेचे आरोप होते अशा अनेकांना वगळण्यात आलं .

तर फडणवीसांचं 90 टक्के मंत्रीमंडळ रिकामं होईल - संजय राऊत
संजय राऊतांचा महायुतीवर निशाणाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Dec 16, 2024 | 9:51 AM

सुधीर मुनगंटीवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, दीपक केसरकर यांच्यासारख्या ताकदवान नेत्यांना मंत्रीपद मिळालीच नाहीत. अडीच-अडीच वर्षां फॉर्म्युला ठरल्याचं ऐकू येतंय. खरंतर त्यांनी सहा-सहा महिन्यांचा फॉर्म्युला केला असता तर सगळ्यांना मंत्रीपदं मिळाली असती असा टोला संजय राऊत यांनी लगावला. महायुती सरकारच्या मंत्र्याचा शपथविधी काल पार पडला, मात्र त्यामध्ये राज्यातील अनेक ताकदवान नेत्यांना वगळण्यात आलं, मंत्रीपद देण्यात आलंच नाही, त्यावरून राऊतांनी टोला लगावत महायुती सरकारवर टीका केली. जे आमच्याकडून सोडून गेले ते सत्ता, पद आणि पैसा या मोहासाठी गेलेत. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे, अकार्यक्षमतेचे आरोप होते अशा अनेकांना वगळण्यात आलं आहे. छगन भुजबळ यांना वगळण्यामागे जातीय राजकारण आहे, असा आरोपही राऊत यांनी केला.

जशी कर्म तशी फळं 

छगन भुजबळ यांची शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याची साथ सोडली, ते सगळ्यांसाठी क्लेषदायक होतं. राजकारणामध्ये ज्याला त्याला आपल्या कर्माची फळं मिळत असतात, अशी टीका राऊतांनी केली.

मंत्र्याच्या कामगिरीचं ऑडिट करणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं, त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ‘देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदींचे अंधभक्त आहेत. त्यामुळे वरती (केंद्रात) नरेंद्र मोदी हे अशी जुमलेबाजी करत असतात, त्यामुळे त्यांचे चेलेही खाली ( राज्यात) तेच करत असतात. भ्रष्टाचारबाबत झिरो टॉलरन्स ही नरेंद्र मोदी यांची घोषणा आहे. देवेंद्र फडणवीसांना हा झिरो टॉलरन्सचा विषय महाराष्ट्रामध्ये राबवाल तर त्यांचं 90 टक्के मंत्रीमंडळ रिकामं होईल, ‘ असं संजय राऊत म्हणाले. दिल्लीत नरेंद्र मोदी हे सर्व भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या सभोवती घेऊन बसले आहेत, तसेच हे देवेंद्र फडणवीससुद्धा महाराष्ट्रतल्या सर्व ताकदीच्या भ्रष्टाचाऱ्यांना आप्लाय अवतीभोवती घेऊन बसले आहे. त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष देऊ नका, ऑडिट वगैरे काही होणार नाही. त्यांच ऑडिट जनताच करेल, असे राऊत म्हणाले.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.