संजय राऊत यांच्या बॉम्बवरुन रवी राणा यांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल, रवी राणा थेट बक्षीसच देणार…

हिवाळी अधिवेशनच्या दरम्यान नागपुरात आलेल्या संजय राऊत यांनी सुतळी बॉम्बचा फोटो ट्विट केला होता, त्यावरुन मोठा बॉम्ब फोडणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हंटले होते. त्यावर रवी राणा यांनी हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत यांच्या बॉम्बवरुन रवी राणा यांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल, रवी राणा थेट बक्षीसच देणार...
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Dec 27, 2022 | 12:24 PM

नागपूर : आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी नुकताच एक सुतळी बॉम्बचा फोटो शेअर करत मोठा बॉम्ब फोडणार असल्याचे जाहीर केले होते, त्यावर आमदार रवी राणा यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. संजय राऊत यांनी विदर्भात येऊन बॉम्ब फोडण्याची भाषा करू नये. त्यांचे आधीच चाळीस आमदार गेले हाच बॉम्ब फुटला आहे. आम्ही जर बॉम्ब फोडला तर संजय राऊत, उद्धव ठाकरे सुद्धा दिसणार नाहीत अशी टीका रवी राणा यांनी केली. याच वेळी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जेलमध्ये जातील असा इशारा सुद्धा राणा यांनी नागपूरमध्ये टीव्ही 9 मराठीशी बोलत असतांना केला आहे. उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षात काय काम केलं हे दाखवावं मी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना बक्षिस देईन असं खुलं आव्हान देखील राणा यांनी दिलं आहे.

नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू सुरू आहे. त्याच दरम्यान उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत हे देखील नागपूर दौऱ्यावर आहेत.

नागपूर दौऱ्यावर असतांना सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांनी केलेला भ्रष्टाचार बाहेर काढून राजीनाम्याची मागणी केली जात आहे. असून वातावरण अधिकच तापलं आहे.

हे सुद्धा वाचा

हिवाळी अधिवेशनच्या दरम्यान नागपुरात आलेल्या संजय राऊत यांनी सुतळी बॉम्बचा फोटो ट्विट केला होता, त्यावरुन मोठा बॉम्ब फोडणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हंटले होते.

एकूणच सत्ताधारी पक्षातील आमदार आणि मंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधक करत असतांना आमदार रवी राणा यांनी थेट आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे जेलमध्ये जातील असा इशारा दिला आहे.

संजय राऊत यांच्या उद्धव ठाकरे यांना बक्षीस देईल असे म्हणत रवी राणा यांनी अडीच वर्षात काय केलं असा सवाल उपस्थित केला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.