स्वाभिमानीच्या बैठकीत रविकांत तुपकर यांच्याबाबत निर्णय होण्याची शक्यता

| Updated on: Aug 08, 2023 | 9:42 AM

आज पुण्यात स्वाभिमानी पक्षाच्या शिस्तपालन आणि कोअर कमिटीने बैठक आयोजीत केली आहे. त्या बैठकीला रविकांत तुपकर आणि राजू शेट्टी यांना उपस्थित राहण्यास सांगितलं आहे.

स्वाभिमानीच्या बैठकीत रविकांत तुपकर यांच्याबाबत निर्णय होण्याची शक्यता
ravikant tupkar
Follow us on

मुंबई : स्वाभिमानी पक्षाच्या शिस्तपालन आणि कोअर कमिटीची आज पुण्यात बैठक आयोजित करण्यात आली आहे. आजच्या विशेष बैठकीत रविकांत तुपकर (ravikant tupkar) यांच्याबाबत निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आजच्या बैठकीला राजू शेट्टी (raju shetti) हे उपस्थित राहणार आहेत. रविकांत तुपकर हे आजच्या पुण्यातील बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळाली आहे. मागच्या काही दिवसांपासून रविकांत तुपकर हे पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची राज्यात चर्चा सुरु आहे. त्यामुळे आजच्या पुण्यातील बैठकीकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे. त्याचबरोबर रविकांत तुपकर (maharashtra politics news) सुध्दा आज भूमिका स्पष्ट करणार असल्याची चर्चा आहे.

मागच्या काही महिन्यांपासून रविकांत तूपकर आणि राजू शेट्टी यांच्यात वाद सुरु असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर राजू शेट्टी यांनी मागच्या आठवड्यात बुलढाणा भागात एक बैठक घेतली होती. त्यावेळी रविकांत तुपकर यांनी त्या बैठकीला हजेरी लावली नाही. त्यानंतर दोघांमध्ये बिनसलं असल्याच्या चर्चा जोर धरु लागली. त्याचबरोबर रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांच्यावर जाहीरपणे माध्यमांच्यासमोर टीका सुध्दा केली होती.

हे सुद्धा वाचा

आज पुण्यात स्वाभिमानी पक्षाच्या शिस्तपालन आणि कोअर कमिटीने बैठक आयोजीत केली आहे. त्या बैठकीला रविकांत तुपकर आणि राजू शेट्टी यांना उपस्थित राहण्यास सांगितलं आहे. राजू शेट्टी हे पुण्यात दाखल झाले आहेत. त्याचबरोबर बैठकीला सु्ध्दा उपस्थित राहणार आहे. रविकांत तुपकर हे आजच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळाली आहे. आजच्या बैठकील रविकांत तुपकर उपस्थित न राहिल्यास त्यांच्यावर शिस्तपालन आणि कोअर कमिटी काय कारवाई करणार याकडे राज्यातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.