Good News: रानवाटेवर केशराचा पाऊस; भारतात दुर्मिळ झालेल्या लाल मानेच्या ससाण्याचे घडले दर्शन!

राज्यव्यापी पक्षी निरीक्षण सप्ताहमध्ये महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेला भारतात अतिशय दुर्मिळ झालेल्या लाल मानेच्या ससाण्याचे दर्शन घडले आहे. त्यामुळे पक्षीप्रेमींचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

Good News: रानवाटेवर केशराचा पाऊस; भारतात दुर्मिळ झालेल्या लाल मानेच्या ससाण्याचे घडले दर्शन!
भारतात दुर्मिळ झालेल्या लाल मानेच्या ससाण्याचे (Falco peregrinus) सुखना प्रकल्पात दर्शन झाले.
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 7:17 PM

नाशिकः हवामान बदलाचे बसणारे तडाखे, कधीही येणारा ढगफुटीसारखा पाऊस आणि कुठेही पडणारा दुष्काळ. या भयंकर संकटाच्या पार्श्वभूमीवर एक सुखद बातमी पर्यावरण क्षेत्रातून आली आहे. नुकत्याच झालेल्या राज्यव्यापी पक्षी निरीक्षण सप्ताहमध्ये महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेला भारतात अतिशय दुर्मिळ झालेल्या लाल मानेच्या ससाण्याचे दर्शन घडले आहे. त्यामुळे पक्षीप्रेमींचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

पक्ष्यांचे संवर्धन करून भारतीय पक्षीविश्व आणि पक्षी अभ्यासशास्त्रास जागतिक स्तरावर पोहचवण्याचे काम पैगंबरवासी डॉ. सालिम अली यांनी केले. महाराष्ट्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व मारुती चितमपल्ली यांनीही या कामात भर घातली. या दोघांचाही महाराष्ट्रातील पक्षीविश्वाशी खूप जवळचा संबंध. खरे तर त्यांनी रचलेल्या पायावरच महाराष्ट्रातील पक्षीमित्र वाटचाल करीत असतात. योगायोगाने या दोहोंचा जन्मदिवस नोव्हेंबर महिन्यात येतो. त्यात मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिन 5 नोव्हेंबर असून, पै. डॉ. सालिम अली यांची जयंती 12 नोव्हेंबरला असते. हा योगायोग साधून मारुती चितमपल्ली यांना त्यांच्या जन्मदिनी शुभेच्छा देण्याकरिता व डॉ. सालिम अली यांना आदरांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेतर्फे राज्यभर पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या पक्षी सप्ताहामध्ये औरंगाबाद जवळील सुखना मध्यम प्रकल्पात  भारतात अतिशय दुर्मिळ झालेल्या लाल मानेच्या ससाणा (red-necked falcon red) पक्ष्याचे दर्शन पक्षी मित्रांना झाले आहे. त्यामुळे त्यांना अतिशय आनंद झाला आहे. ही आपल्या साऱ्यांसाठीही तितकीच आनंददायी घटना आहे.

हे आहे महत्त्व

महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे सदस्य आणि निसर्ग मित्र मंडळाचे सचिव किशोर गठडी म्हणाले की, ‘लाल मानेच्या ससाण्याचे शास्त्रीय नाव Falco peregrinus आहे. हा भारतात अतिशय दुर्मिळ असून, तो ससाणा जातीतील शिकारी पक्षी आहे. चपळ शरीर आणि अतिशय वेगवान हालचाली करून उडणाऱ्या पक्ष्यांची शिकार करण्यात तो पटाईत आहे. डोक्यावरच्या तसेच माणेवरच्या लाल रंगावरून हा पक्षी ओळखता येतो.

‘डीडीटी’ वापरामुळे दुर्मिळ

किशोर गठडी म्हणाले की, ‘साधारणतः जोडीने शिकार करणाऱ्या या पक्ष्याचे दुर्मिळ होण्याचे मुख्य कारण ‘डीडीटी’ या कीटकनाशकाचा मोठया प्रमाणावरील वापर हे आहे. ससाणा आपल्या शिकारीचा आकाशातून पाठलाग करताना प्रतितास सरासरी 250 ते 300 एवढा वेग संपादन करू शकतो. त्याचे दर्शन बिघडलेल्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर सुखद धक्का आहे. या पक्ष्यांचे जतन आणि संवर्धन आपण साऱ्यांनीच केले पाहिजे. तरच निसर्ग साखळी सुरळीत सुरू राहील.’

41 पक्ष्यांच्या नोंदी

राज्यव्यापी पक्षीनिरीक्षणात अनेक पक्ष्यांच्या नोंदी पक्षीप्रेमींना मिळाल्या आहेत. त्यात सुखणा मध्यम प्रकल्पात पांढऱ्या मानेचा ससाणा (red-necked falcon red), चक्रवाक, चमचा (black), राखी बदक (Spot billed duck), तलवार बदक (Pintail duck),वेडा राघू (Green bea eater), कुरव पक्षी (Sea gull), पांढऱ्या छातीची पाणकोंबडी (White breasted waterhen), खंड्या (White breasted kingfisher) काष्ठ खाटिक (Wood shrike), कोतवाल (Black drongo), नदीसुरय (River tern), राखी बगळा (Grey heron), कापशी घार (Black winged kite), गप्पीदास (Pied bushchat), ठिपक्यांचा होला (Spotted dove), शेकाट्या (Black winged stilt), पिवळा धोबी (Yellow wagtail), रंगीत करकोचा (Painted stork), मोठा वटवट्या , धान तिरचिमणी (Great Reed warbler), पांथळ चरचरी (PADDY-FIELD PIPIT)ऑस्प्रे आदी 41 पक्ष्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत. या पक्ष्यांचे संवर्धन करावे, असे आवाहन पक्षीमित्रांनी केले आहे.

इतर बातम्याः

मतदार याद्यांमध्ये 48 हजार नावे दुबार; फोटो जुळल्याने फुटले बिंग, नाशिकचा घोळ निस्तारेना

बहुचर्चित कांदे-भुजबळ वादाची मुख्यमंत्र्यांकडून दखल; प्रशासकीय कागदपत्रे मागवली

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.