VIDEO: Nanarमध्ये रिफायनरी होणार नाही, आदित्य ठाकरेंचं आश्वासन

कुठलाही प्रकल्प होत असताना स्थानिक लोकं महत्त्वाची आहेत. लोकांची इच्छा आणि होकार असेल तर नक्की पुढे जाऊ. लोकांचा विश्वास जिंकूनच आपल्याला पुढे जायचं आहे.

VIDEO: Nanarमध्ये रिफायनरी होणार नाही, आदित्य ठाकरेंचं आश्वासन
Nanarमध्ये रिफायनरी होणार नाही, आदित्य ठाकरेंचं आश्वासनImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 29, 2022 | 12:41 PM

राजापूर: कुठलाही प्रकल्प होत असताना स्थानिक लोकं महत्त्वाची आहेत. लोकांची इच्छा आणि होकार असेल तर नक्की पुढे जाऊ. लोकांचा विश्वास जिंकूनच आपल्याला पुढे जायचं आहे. लोकांना डावलून पुढे जात नाही, असं सांगतानाच नानारमध्ये रिफायनरी होणार नाही, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी स्पष्ट केलं. नाणार (nanar refinery) समर्थकांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना नाणारमध्ये रिफायनरी होणार नसल्याचं सांगतानाच धोपेश्वरमध्ये लोकांशी चर्चा केली जाईल, असं स्पष्ट केलं. तर कुठेही प्रकल्प झाला तरी हरकत नाही. फक्त विकास झाला पाहिजे, असं त्यांनी स्पष्ट केलं. विदर्भात रिफायनरी प्रकल्प नेण्याची भाजपकडून (bjp) मागणी होत आहे. त्याबाबतचा प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे यांनी ही भूमिका स्पष्ट केली.

राजापूर गेस्ट हाऊस येथे रिफायनरी समर्थक मोठ्या प्रमाणावर जमले होते. यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. समृद्धी मांजरेकर आणि संगीता बाणे या दोन महिलांनी रिफायनरी समर्थनाची बाजू मांडली थेट आदित्य ठाकरे यांच्याकडे मांडली. त्यानंतर सरकारची भूमिका स्पष्ट केली. लोकांच्या मनात जे आहे ते डावलून पुढे जाणार नाही. सर्वांना सोबत घेऊन हा प्रश्न सोडवू चांगले काही होत असेल तर नक्की करू. तुम्ही सर्व लोकं हो बोलला तरच आपण पुढे जाऊ, असंही आदित्य यांनी स्पष्ट केलं.

विश्वासाला तडा जाऊ देणार नाही

कुठेही चांगला मोठा प्रकल्प येत असेल तर स्थानिक लोकांबरोबर चर्चा करून त्यांचे न्याय हक्क कसे अबाधित राहतील, त्यांचं नुकसान होणार नाही आणि त्यांचा विश्वास संपादन करून आम्हाला पुढे जायचं आहे. कुणाच्याही विश्वासाला तडा देऊन आम्हाला पुढे जायचं नाही, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

VIDEO: प्रदूषण होणार नसेल तर रिफायनरीला मान्यता देऊ, Aaditya Thackeray यांचं मोठं विधान

जळगावमध्ये कायदा हातात घेणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हा; मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली नसतानाही दाम्पत्याला बेदम मारहाण

बीएस्सी नर्सिंग प्रवेशासाठी मुदतवाढ नाहीच, 31 मार्चपर्यंतच प्रवेशप्रक्रिया!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.