पवारांनी साताऱ्याला दिलेली रेमडीसिव्हीर इंजेक्शन गहाळ प्रकरण, गृहराज्यमंत्र्यांचा कारवाईचा इशारा

175 रेमडीसिव्हीर इंजेक्शनपैकी काही इंजेक्शन सातारा जिल्हा रुग्णालयातून गायब झाली असल्याचे सांगत सातारा राष्ट्रवादीकडून चौकशीची मागणी करण्यात आली आहे

पवारांनी साताऱ्याला दिलेली रेमडीसिव्हीर इंजेक्शन गहाळ प्रकरण, गृहराज्यमंत्र्यांचा कारवाईचा इशारा
Follow us
| Updated on: Aug 20, 2020 | 11:24 AM

सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा जिल्ह्यातील गरीब, गरजूंचे जीव कोरोनाच्या आजारातून वाचावे, यासाठी 175 रेमडीसिव्हीर इंजेक्शन सातारा जिल्हा रुग्णालयाला दिले होते. यापैकी काही इंजेक्शन जिल्हा रुग्णालयातून गायब झाल्याचा आरोप सातारा राष्ट्रवादीने केला होता. त्यानंतर गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. (Remdesivir Injections given by Sharad Pawar in Satara allegedly gone missing)

शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी 125 रेमडीसिव्हीर इंजेक्शन सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून दिली होती. तर 50 रेमडीसिव्हीर इंजेक्शन कराड येथे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे सुपूर्द केली होती.

एकूण 175 रेमडीसिव्हीर इंजेक्शनपैकी काही इंजेक्शन सातारा जिल्हा रुग्णालयातून गायब झाली असल्याचे सांगत सातारा राष्ट्रवादीकडून या प्रकाराच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीने जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदनही दिले आहे

नव्याने रुजू झालेले जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी याबाबत माहिती घेत असल्याचे सांगितले आहे, मात्र कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला.

हेही वाचा : शरद पवारांच्या उपस्थितीत कराडमध्ये कोरोना आढावा बैठक, उदयनराजेंनी उपस्थिती टाळली

रेमडीसिव्हीर इंजेक्शन बाहेर मेडिकल स्टोअरमध्ये मिळत नाहीत, पण बाजारभावाने एका इंजेक्शनची किंमत पाच हजार रुपये आहे. मात्र 25 हजार रुपयांना ब्लॅकने विकली जातात. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाने सखोल चौकशी करण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले आहेत. या प्रकरणात जे दोषी सापडतील त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले आहे.

सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या 8500 वर गेली आहे. शरद पवार यांनी दिलेल्या 175 रेमडिसिव्हर इंजेक्शनपैकी काही रुग्णालयातून गायब होणे गंभीर असून या इंजेक्शनचा वापर कोठे करण्यात आला, याची यादी जाहीर करण्याची मागणी जनसामान्यातून होत आहे.

(Remdesivir Injections given by Sharad Pawar in Satara allegedly gone missing)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.