सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांकडून रमेश देव यांच्या आठवणींना उजाळा | Ramesh Deo Passed Away |
मराठी चित्रपटसृष्टी मधील हरहुन्नरी आणि रुबाबदार व्यक्तिमत्व अशी ओळख असणारे जेष्ठ अभिनेते रमेश देव (Ramesh Deo) यांचा काल सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. कोकिलाबेन हॉस्पिटल(Kokilaben Hospital)मध्ये त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला.
मराठी चित्रपटसृष्टी मधील हरहुन्नरी आणि रुबाबदार व्यक्तिमत्व अशी ओळख असणारे जेष्ठ अभिनेते रमेश देव (Ramesh Deo) यांचा काल सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. कोकिलाबेन हॉस्पिटल(Kokilaben Hospital)मध्ये त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. रमेश देव हे 93 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी अभिनेत्री सीमा देव आणि मुलं अजिंक्य देव आणि अभिनय देव असा त्यांचा एकूण परिवार होता. पार्थिव त्यांच्या राहत्या घरी “रुपरंग” सोसायटीमध्ये आणण्यात आलं. इथं त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलंय. दुपारी तीन वाजता विलेपार्ले (Vile Parle) येथील पारसीवाडा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. राजकारणातील अनेक दिग्गज नेत्यांकडून तसेच मराठी चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांकडून ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला तसेच त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
Latest Videos