अंबरनाथ बदलापुरात घरांच्या किमती वाढणार, बांधकाम व्यावसायिक संघटनेचा निर्णय
अंबरनाथ आणि बदलापुरात परवडणारी घरांची मागणी वाढत असल्याने तिथे देशातील अनेक गृह प्रकल्प उभारण्यासाठी नामाांकित संस्था घर प्रकल्प उभारण्यासाठी उतरले आहेत.
मुंबई – कोरोनाच्या (corona) काळात घरांची विक्री पुर्णपणे थांबली होती. कोरोनाच्या विळख्यातून आता कुठे तरी उसंत मिळत असताना, बांधकाम व्यवसायिकांनी (Builders) अंबरनाथ (ambernath) आणि बदलापुरात (badlapur) घरांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. परवडणारी घरे अंबरनाथ आणि बदलापुरात मिळत असल्याने अनेकांचा तिकडं घरे घेण्यासाठी यापुर्वी ओढा होता. प्रति चौरस फुट 500 रूपयापर्यंत ही वाढ करणार असल्याची घोषणा अंबरनाथ-बदलापूर बांधकाम व्यवसायिक संघटनेकडून करण्यात आली आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अंबरनाथ आणि बदलापूर या शहरात इतर शहरांच्या तुलनेत घरांची दरवाढ नगण्य राहिली आहे. दर्जा टिकवण्यासाठी हा निर्णय संघटनेनं घेतला असल्याचं पदाधिका-यांनी सांगितलं आहे.
या कारणामुळे घेतला किमती वाढवण्याचा घेतला निर्णय
मुंबई शहरात नोकरी निमित्त आलेल्या प्रत्येकाला आपलं मुंबईत किंवा जवळच्या शहरात घरं असाव असं स्वप्न असतं. अंबरनाथ आणि बदलापुरात परवडणारी घरं मिळत असल्याने अनेकांची तिथल्या घरांना पसंती होती. मुंबईत नोकरी निमित्त आलेल्या अनेक मध्यवर्गीय कुटुंब अंबरनाथ आणि बदलापुरात वास्तव करीत आहेत. चांगलं वातावरण असल्याने अनेकांची त्या परिसरात पसंती आहे. इतक्या वर्षात तिथं इतर शहराच्या तुलनेत अत्यंत कमी प्रमाणात घरांच्या किमतीची वाढ राहिली आहे. परंतु दर्जा टिकवण्यासाठी हा बांधकाम व्यावसायिक संघटनेचा किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बांधकाम साहित्याच्या दरात सुध्दा 40 ते 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे परवडणारी घरं अशक्य वाटत आहे. अशावेळी दर्जा वाढवण्यासाठी दरवाढ गरजेची असल्याचे अजय ठाणेकर यांनी सांगितले आहे.
प्रति चौरस फुट 500 रूपयापर्यंत ही वाढ
अंबरनाथ आणि बदलापुरात परवडणारी घरांची मागणी वाढत असल्याने तिथे देशातील अनेक गृह प्रकल्प उभारण्यासाठी नामाांकित संस्था घर प्रकल्प उभारण्यासाठी उतरले आहेत. सध्या बदलापूर शहरात अनेक नामांकित संस्थाचे मोठे गृहसंकुले उभे राहत आहेत. पण अनेक वर्षांपासून लोकांना परवडणा-या दरात घरं देण्यात होती त्यामुळे आता प्रति चौरस फुट 500 रूपयापर्यंत ही वाढ करण्याचा निर्णय बांधकाम व्यावसायिक संघटनेने निर्णय घेतला आहे.