संसर्ग वाढू नये म्हणून वाशिममध्ये कडक निर्बंध, विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
वाशिम शहरात पोलीस अधीक्षक वसंत परदेशी आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक मोरे यांनी शहरात विना मास्क फिरणाऱ्यावर कारवाई सुरु केली आहे.

वाशिम : वाशिम जिल्ह्यात एका आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे हा संसर्ग वाढू नये (Restrictions For Corona Virus), यासाठी विविध निर्बंध घालण्यात आले आहेत. नगरपालिका क्षेत्रात आवश्यक त्या उपाययोजना तातडीने हाती घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिलेत (Restrictions For Corona Virus).
त्यानंतर आज सकाळपासूनच वाशिम शहरात पोलीस अधीक्षक वसंत परदेशी आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक मोरे यांनी शहरात विना मास्क फिरणाऱ्यावर कारवाई सुरु केली आहे. तसेच, शहरातील मोठ्या गर्दीचे ठिकाण होणारे महात्मा फुले मार्केट पूर्णतः बंद करण्यात आले आहे.
विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई
जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी वाशिम नगर परिषद क्षेत्रात गर्दीवर नियंत्रण आणण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर शहरात आज सकाळ पासून विनामास्क फिरणाऱ्यांवर नगर परिषदेने कारवाई सुरु केली आहे.
काम नसताना नागरिकांनी बाहेर पडू नये, तसेच जेष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी घरीच राहण्याचे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक मोरे यांनी केले आहे.
वाशिम जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जमावबंदीसह रात्रीची संचार बंदी लागू करण्यात आली आहे. लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमासाठी केवळ 50 व्यक्तींना परवानगी असून जे नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे (Restrictions For Corona Virus).
आज वाशिमच्या मुख्य बाजारपेठेत पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी मास्क न वापरण्याऱ्यांवर कारवाई केली आहे. नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळण्याचं आवाहन वाशिमचे पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी केले आहे.
अमरावतीने राज्याचं टेन्शन वाढवलं, कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढhttps://t.co/D57rUM9pF0#coronavirus #CoronaVaccine #CoronavirusVaccine
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 18, 2021
Restrictions For Corona Virus
संबंधित बातम्या :
संजय राठोडांच्या भागात परिस्थिती गंभीर; कदाचित लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल: अजित पवार
कोरोनाग्रस्त वाढतेच, ‘त्या’ तीन शहरांबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेणार : अजित पवार
कोरोनाच्या युटर्नमुळे राज्यात धोका वाढला, ‘या’ जिल्ह्यामध्ये घरं सील करण्याचा पालिकेचा निर्णय