Pune accident : कारच्या धडकेत ऑटोरिक्षाचा चुराडा, सीएनजीचा सिलिंडरही फुटला; गोऱ्हे खुर्दमधल्या अपघातात रिक्षाचालक गंभीर

हवेली पोलीस आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आणि तातडीने जखमी व्यक्तीस खासगी रुग्णवाहिकेने उपचारांसाठी पाठविण्यात आले. जखमी रिक्षाचालकाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सध्या सुरू आहेत.

Pune accident : कारच्या धडकेत ऑटोरिक्षाचा चुराडा, सीएनजीचा सिलिंडरही फुटला; गोऱ्हे खुर्दमधल्या अपघातात रिक्षाचालक गंभीर
गोऱ्हे खुर्दमधील अपघातानंतर दाखल झालेले पोलीस, अग्निशामक दल आणि स्थानिकImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 10:31 AM

पुणे : पानशेत रस्त्यावरील गोऱ्हे खुर्द (Gorhe Khurd) गावच्या हद्दीत व्यंकटेश्वरा शाळेजवळ रिक्षा आणि कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात रिक्षाचालक नारायण प्रभाकर दारवटकर (रा. कोंडगाव, ता. वेल्हे) हा गंभीर जखमी झाला आहे. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला (Pune accident) असून जखमी व्यक्तीस उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची तीव्रता एवढी होती, की यात रिक्षाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक रहिवासी शशिकांत किवळे आणि इतर तरूण मदतीसाठी धावले. रिक्षाची सीएनजीची टाकी फुटल्याने (CNG cylinder blast) गॅस गळती सुरू होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शशिकांत किवळे यांनी हवेली पोलीस आणि पीएमआरडीएच्या अग्निशामक दलाला माहिती कळवली.

रिक्षाचालकाची प्रकृती गंभीर

हवेली पोलीस आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आणि तातडीने जखमी व्यक्तीस खासगी रुग्णवाहिकेने उपचारांसाठी पाठविण्यात आले. जखमी रिक्षाचालकाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सध्या सुरू आहेत. रिक्षा आणि कारची धडक, सीएनजीच्या टाकीतून गळती आणि त्यानंतर सीएनजीचा स्फोट यामुळे रिक्षाचालक यात गंभीर जखमी झाला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

हे सुद्धा वाचा

वारंवार होताहेत अपघात

चार महिन्यांपूर्वी गोऱ्हे खुर्द येथील शौर्य हॉटेलच्या समोर एक अपघात झाला होता. वेगात असलेली कार उलटून यामध्ये भूषण रोहिदास किवळे (वय 25 रा. नांदोशी, ता. हवेली) या तरुणाचा मृत्यू झाला. तर इतर तिघे गंभीर जखमी झाले होते. तर मे महिन्यात एक अपघात झाला होता. एक कार खड्डयात पडून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. दोन जण जखमी झाले होते. सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली होती. नितीन घाणेकर (वय 22, रा. राजेंद्रनगर, तेंडुलकर पार्क, नवी पेठ) असे तरुणाचे नाव होते तर शंतनू वडनेरे (वय 22 रा. कमला नेहरू पार्क समोर), शुभम ढेबे (रा. 24, रा. सिंहगड रोड, विठ्ठलवाडी) असे दोघेजण जखमी झाले होते.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.