खाद्यतेलाच्या किमतीत मोठी वाढ, गृहिणींचं बजेट कोलमडलं

बाजारात खाद्यतेलाच्या किमतीत झालेली वाढ पुढील 2 ते 3 महिने कायम राहण्याची शक्यता व्यापारी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.

खाद्यतेलाच्या किमतीत मोठी वाढ, गृहिणींचं बजेट कोलमडलं
खाद्यतेलावर स्टॉक मर्यादा नियम लागू, पण किमती कमी होण्यास लागेल वेळ
Follow us
| Updated on: Jan 04, 2021 | 8:16 AM

नागपूर: सोयाबीनसह सर्वच खाद्यतेलाच्या किमतींमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मोठी वाढ झाली आहे. त्यात प्रामुख्याने सोयाबीन, सूर्यफूल, सरकी, पामतेलाचा समावेश आहे. अतिवृष्टी आणि पावसामुळे तेलबियांच्या उत्पादनाला फटका बसलाय. तसंच आयात शुल्कात मोठी वाढ करण्यात आल्यानं खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे गृहिणींचं महिन्याचं बजेट कोलमडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. (Rising edible oil prices hit ordinary citizens)

बाजारात खाद्यतेलाच्या किमतीत झालेली वाढ पुढील 2 ते 3 महिने कायम राहण्याची शक्यता व्यापारी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. सर्वसामान्य नागरिकांकडून स्वयंपाकासाठी पामतेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याचबरोबर अन्नप्रक्रिया उद्योगातही पामतेलाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. मात्र पामतेलाची किंमत जवळपास 120 हून अधिक झाल्यानं सामान्य नागरिकांना त्याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.

दुसरीकडे सोयाबीन तेलाचा दर 135 रुपये प्रति किलोवर जाऊन पोहोचला आहे. अवघ्या दोन महिन्यात सोयाबिनच्या दरात 35 रुपयांनी वाढ झाली आहे. सूर्यफुलाच्या तेलाची किंमत 145 रुपये प्रति किलोवर जाऊन पोहोचली आहे. यंदा देशात सोयाबीन आणि कच्च्या तेलाची आयात 70 टक्क्यांवर गेलीय. केंद्र सरकारनं आयात खर्च वाढवल्यानं देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

खाद्यतेलाच्या किमती का वाढत आहेत?

भारतात सर्वसाधारणपणे 70 टक्के खाद्यतेल हे परदेशातून आयात केलं जातं. तर 30 टक्के भारतात तयार होतं. यंदा कोरोना संकटामुळं अन्य देशांमधून होणारी खाद्यतेलाची आयात ठप्प झाली होती. त्यातच केंद्र सरकारनं पामतेलावरील आयात शुल्क वाढवलं आहे. त्याचा परिणाम खाद्यतेलांच्या किंमतीवर झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळं सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झाल्यामुळे उत्पन्नात घट झाली. त्याचा परिणामही खाद्यतेलाच्या निर्मितीवर झाला आहे.

किरकोळ बाजारातील तेलाचे दर (प्रति किलो)

– सोयाबीन तेल – १३५ रुपये – सरकी तेल – 115 रुपये – सूर्यफूल तेल – 145 रुपये – पामतेल – 121 रुपये – शेंगदाणा तेल – 160 रुपये

संबंधित बातम्या:

Detox Drink | शरीराला निरोगी राखण्यात मदत करतील ‘ही’ डीटॉक्स ड्रिंक्स, डाएटमध्ये नक्की सामील करा!

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘व्हिटामिन ए’ची कमतरता भरून काढणाऱ्या विदेशी रताळ्याच्या पिकाने मिळेल दुप्पट उत्त्पन्न!

Rising edible oil prices hit ordinary citizens

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.