Video: काल जयंतराव आज रोहितबाबा! राष्ट्रवादींच्या नेत्यांना लालपरी चालवण्याची भुरळ, व्हिडीओ पाहावाच लागतुया लका
दोन नवीन गाड्यांच्या फेऱ्या सुरु करताना आगाराने युवानेते रोहित आर. आर. पाटील यांना निमंत्रित केले होते. यावेळी रोहित पाटील हे कवठेमहांकाळहून मुंबईकडे फेरी घेऊन जाणाऱ्या गाडीच्या स्टेअरिंगवर जाऊन बसले आणि त्यांनी स्वत: ड्रायव्हिंग करत नवीन फेरीची सुरुवात केली.
सांगलीः सांगलीचे नेते सत्तेत असो, नसो मात्र सांगली जिल्ह्याच्या राजकारणाची आणि राजकीय नेत्यांची चर्चा मात्र गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत होत असते. कधी जयंत पाटील कुणाचा करेक्ट कार्यक्रम करत असतात, तर आर.आर. आबानंतर ज्यांच्याकडे ज्युनियर आबा म्हणून बघितेल जाते, त्या रोहित पाटील (Rohit R.R.Patil) यांच्याही साधेपणाची आणि माणसातील नेतेपणाची जोरदार चर्चा होत असते. स्वातंत्र्यदिनानिमित्त काल राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी एसटी चालवल्यानंतर त्यांची जोरदार चर्चा झाली त्यानंतर आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचा युवानेता आणि ज्युनियर आबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित आर. आर. पाटील (R.R. Patil’s Son) यांनी लालपरीचे स्टेअरिंग हातात घेऊन लालपरीचे सारथ्य (Bus Drivimg) केल्यानंतर त्यांचा बस चालवतानाच व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
ज्युनिअर आबा फॉर्मात! काल जयंत रावांनी एसटी चालवली, आज रोहित पाटलांनी स्टेअरींग हातात घेतलं, एसटी महाराष्ट्राचा दागिना आहे, तिला जपा म्हणजे झालं… घालून मिरवायलाही काही हरकत नाही… #STBus pic.twitter.com/wYbX3bX3Xl
— Siddhesh Sawant (@ssidsawant) August 16, 2022
माजी गृहमंत्री स्वर्गीय आर. आर. पाटील यांचे सुपुत्र तथा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते रोहित पाटील यांनी स्वातंत्र्यदिनी सांगलीच्या कवठेमंकाळ आगाराच्या नवीन बसचे सारथ्य केले आहे. कवठेमहांकाळ आगाराला महामंडळाने नुकत्याच दोन नवीन गाड्या दिलेल्या आहेत.
कवठेमहांकाळ आगारीतील लालपरी
दोन नवीन गाड्यांच्या फेऱ्या सुरु करताना आगाराने युवानेते रोहित आर. आर. पाटील यांना निमंत्रित केले होते. यावेळी रोहित पाटील हे कवठेमहांकाळहून मुंबईकडे फेरी घेऊन जाणाऱ्या गाडीच्या स्टेअरिंगवर जाऊन बसले आणि त्यांनी स्वत: ड्रायव्हिंग करत नवीन फेरीची सुरुवात केली.
रोहितदादांनी केले लालपरीचे सारथ्य
युवानेते रोहित आर. आर. पाटील यांनी कवठेमहांकाळ आगाराच्या बसचे सारथ्य केल्यानंतर सारथ्य करतान असतानाचा त्यांचा हा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सांगलीच्या राजकारणाची आणखी चर्चा होऊ लागली आहे. राष्ट्वादी पक्षामध्ये सर्वात लहान पण नेहमी चर्चेत असणारे नाव म्हणजे रोहित पाटील आहे. जयंत पाटलांच्या व्हिडीओनंतर याही व्हिडीओची जोरदार चर्चा केली जात आहे.