बाळासाहेब ठाकरेंवरुन राष्ट्रवादी-भाजपत ‘ट्विट वॉर’, रोहित पवार म्हणतात “राजकीय पतंगबाजी टाळली तर बरं होईल”

युतीत असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता ते फक्त उद्धवजींचे वडील?, असा सवाल रोहित पवारांनी भाजपला विचारला आहे. (rohit pawar criticizes atul bhatkhalkar)

बाळासाहेब ठाकरेंवरुन राष्ट्रवादी-भाजपत 'ट्विट वॉर', रोहित पवार म्हणतात राजकीय पतंगबाजी टाळली तर बरं होईल
ROHIT PAWAR ATUL BHATKHALKAR
Follow us
| Updated on: Apr 29, 2021 | 10:58 PM

मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना राजकीय शेरेबाजीला रंग चढला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजप आमदार अतुळ भातखळकर ( Atul Bhatkhalkar) यांना चांगलंच धारेवर धरलंय. “युतीत असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता ते फक्त उद्धवजींचे वडील? अशी सोयीस्कर भूमिका बदलावी तर तुम्हीच,” असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे. कोरोनाच्या मुद्द्यावरुन रोहित पवार यांनी केंद्रातील संसदभवानाच्या बांधकामावर टीका केली होती. त्याची दखल घेत अतुल भातखळकर यांनी काही ट्विट करत रोहित पवार यांच्यावर टीका केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून पवार यांनी वरिल वक्तव्य ट्विटद्वारे केलं. (Rohit Pawar criticizes BJP MLA Atul Bhatkhalkar on Shivsena Balasaheb Thackeray)

रोहित पवार काय म्हणाले ?

“युतीत असताना बाळासाहेब ठाकरे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते. आता ते फक्त उद्धवजींचे वडील?. भावना आणि भूमिका सत्तेच्या पलीकडील असतात, असं ऐकलं होतं. परंतु आपल्या भावना सत्ता जाताच बदलल्या. अशी सोयीस्कर भूमिका बदलावी तर तुम्हीच,” असे रोहित पवार ट्विटद्वारे म्हणाले.

केंद्रासारखी जबाबदारी झटकली नाही

पुढे बोलताना त्यांनी राज्यात होणाऱ्या मोफत लसीकरणावरुन भातखळकर यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. “राज्याची स्थिती नाजूक असतानाही राज्याने लसीकरणाचा भार उचलण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारप्रमाणे लसीकरणाची जबाबदारी दुसऱ्यांवर ढकलली नाही,” असं रोहित पवार म्हणाले.

राजकीय पतंगबाजी टाळली तर बरं होईल

तसेच पुढे बोलताना सध्या राजकीय वक्तव्य करण्याची वेळ नाहीये. लोकांचे प्राण पणाला लागलेले आहेत, हे विसरु नये. त्यामुळे सध्या राजकीय पतंगबाजी टाळली तर बरं होईल, असा सल्लासुद्धा त्यांनी अतुल भातखळकर यांना दिला.

अतुल भातखळकर काय म्हणाले ?

देशात कोरोनाचा कहर आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा लागतो आहे. पण देशात नव्या संसद भवनाचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे प्राधान्य कशाला द्यावे याचा विचार करण्याची गरज आहे, असे रोहित पवार म्हणाले होते. त्याला उत्तर म्हणून “मुख्यमंत्री 400 कोटी रुपये खर्चून वडिलांचे स्मारक उभरत आहेत. त्यांना रोहित पवार यांनी लसीकरण महत्त्वाचे की काय हा प्रश्न विचारावा. आपल्या गृहमंत्र्याने फ़क्त मुंबईतून केलेली वसूली दीड हजार कोटी आहे असे म्हणतात. ती रक्कम लसीकरणासाठी वळवा म्हणतो मी,” अशी टिप्पणी भातखळकर यांनी केली. दरम्यान, रोहित पवार आणि अतुल भातखळकर यांच्या या ट्विट वॉरमुळे राजकीय पटलावर अनेक चर्चा रंगल्या आहेत.

इतर बातम्या :

टोपे म्हणतात, कोरोनाची तिसरी लाट जुलै, ऑगस्टमध्ये!

Maharashtra Corona Update : राज्यात 66,159 नव्या कोरोना रुग्णांचं निदान, 771 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

Maharashtra Coronavirus LIVE Update : राज्यात कोरोनाच्या नव्या 66159 नव्या रुग्णांची नोंद, 771 जणांचा मृत्यू

(Rohit Pawar criticizes BJP MLA Atul Bhatkhalkar on Shivsena Balasaheb Thackeray)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.