कुटुंब सांभाळण्याची गोष्ट आपल्या तोंडून शोभत नाही; शरद पवारांवरील वक्तव्यानंतर रोहित पवारांची मोदींवर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी TV9 ला एक्सक्लूझिव्ह मुलाखत दिली. या मुलाखतीत नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीच्या दोन गटामधील संघर्षावर भाष्य केलं. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील वाद, राष्ट्रवादीतील फूट याबद्दल पंतप्रधान मोदींनी वक्तव्य केलं. शरद पवार यांच्यावरही त्यांनी टीका केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क टीव्ही9 ला महामुलाखत दिली. त्यात त्यांनी देशातील अनेक मुद्यांसह महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य केले. या वयात कुटुंब सांभाळू शकत नाही, महाराष्ट्र काय सांभाळणार असा खोचक हल्ला त्यांनी शरद पवारांवर केला. त्यांच्या ही टीका राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या जिव्हारी लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. कुटुंब सांभाळण्याची गोष्ट आपल्या तोंडून शोभते का ? असा खोचक सवाल विचारत “लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण” अशी तुमची गत आहे… असे म्हणत रोहित पवार यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी TV9 ला एक्सक्लूझिव्ह मुलाखत दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांच्यासह TV9 ग्रुपच्या पाच व्यवस्थापकीय संपादकांनी ही मुलाखत घेतली. या मुलाखतीत नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीच्या दोन गटामधील संघर्षावर भाष्य केलं. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील वाद, राष्ट्रवादीतील फूट याबद्दल पंतप्रधान मोदींनी वक्तव्य केलं. राष्ट्रवादी पक्षाच्या स्थितीबाबत शरद पवार कितीही राजकीय रंग देत असले, किती राजकीय मुद्दा बनवला तरी हा कौटुंबिक वाद आहे, घरातील भांडण आहे, असं मोदी म्हणाले. पुतण्याला वारसा सोपवायचा की मुलीकडे हा त्यांचा वाद आहे. सिंपथीऐवजी संतापाचं वातावरण आहे की जे या वयात कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत. ते महाराष्ट्राला काय सांभाळतील? असा हल्लाबोल पंतप्रधानांनी शरद पवार यांच्यावर केला.
.. स्वतः मात्र कोरडे पाषाण अशी गत!
त्यांची ही टीका रोहित पवार यांना रुचली नसून त्यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक ट्विट करून मोदींवर पलटवार केला. ” कुटुंब सांभाळण्याची गोष्ट आपल्या तोंडून शोभते का? “लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण” अशी तुमची गत आहे,” अशी टीका रोहित पवार यांनी केली.
पत्रकारांना कधीही सामोरे न जाणाऱ्या आपल्यासारख्या व्यक्तिमत्त्वाला महाराष्ट्रासाठी एक स्पेशल मुलाखत करावी लागतेय, यावरूनच मराठी स्वाभिमानाचा आणि पवार साहेबांचा आपण किती धसका घेतला, हे आज कळलं. असो! पण मराठी माणूस दिल्लीला कशाप्रकारे झुकवू शकतो याचा एक#स्वाभिमानी मराठी माणूस म्हणून नक्कीच अभिमान आहे, असंही रोहित पवार यांनी नमूद केलं.
आदरणीय मोदी साहेब,#कुटुंब सांभाळण्याची गोष्ट आपल्या तोंडून शोभते का? “लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण” अशी तुमची गत आहे….
पत्रकारांना कधीही सामोरे न जाणाऱ्या आपल्यासारख्या व्यक्तिमत्त्वाला महाराष्ट्रासाठी एक स्पेशल मुलाखत करावी लागतेय, यावरूनच मराठी… pic.twitter.com/u9waWrlX8g
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 2, 2024
भटकती आत्मा म्हणून टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच राज्याचा दौरा केला. ते राज्यात तळ ठोकूनच होते. त्यावेळी त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील अनेक सभांमधून शरद पवार यांच्यावर टीका करताना भटकती आत्मा म्हणून टीका केली. भुताटकी, भटकती आत्मा या नवीन शब्दांची भर मोदींनी राजकीय डिक्शनरीत घातली. त्यानंतर राज्याचे वातावरण ढवळून निघाले. विरोधकांनी पण मोदींवर सडकून टीका केली.