मोदी सरकारकडून शरद पवारांची सुरक्षा हटवल्यानंतर रोहित पवारांची मागणी

शरद पवार हे संरक्षण मंत्री होते, दहा वर्ष कृषिमंत्री होते. त्यांच्या काळात महत्त्वाचे निर्णय घेतले गेले' असं रोहित पवार 'टीव्ही9 मराठी'ला प्रतिक्रिया देताना म्हणाले.

मोदी सरकारकडून शरद पवारांची सुरक्षा हटवल्यानंतर रोहित पवारांची मागणी
Follow us
| Updated on: Jan 24, 2020 | 1:48 PM

मुंबई : सूडाचं राजकारण करुन शरद पवारांची सुरक्षा हटवण्यात आली असेल, तर ती चुकीची गोष्ट आहे. जे देशासाठी महत्त्वाचे नेते आहेत, त्यांची सुरक्षा परत देण्यात यावी, अशी मागणी पवारांचे नातू आणि राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी (Rohit Pawar on Sharad Pawar Security) केली आहे. पवारांच्या दिल्लीतील घरात गस्त घालणारे दिल्ली पोलिसांचे तीन आणि सीआरपीएफचे तीन जवान मोदी सरकारकडून हटवण्यात आले आहेत.

‘केंद्र सरकारकडून जेव्हा सुरक्षा दिली जाते, तेव्हा ती व्यक्ती केंद्र सरकारमध्ये मंत्री होती का, कोणत्या महत्त्वाच्या पदावर किती वर्ष होती, कोणकोणती पदं भूषवली याचा अभ्यास केला जातो. शरद पवार हे संरक्षण मंत्री होते, दहा वर्ष कृषिमंत्री होते. त्यांच्या काळात महत्त्वाचे निर्णय घेतले गेले’ असं रोहित पवार ‘टीव्ही9 मराठी’ला प्रतिक्रिया देताना म्हणाले.

‘आज अख्ख्या देशामध्ये ठराविकच अनुभवी नेते आहेत आणि त्यामध्ये शरद पवारांचा समावेश होतो. पवारांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा देशाला नक्कीच होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्याविषयी वेळोवेळी बोलले आहेत. पवारांची सुरक्षा जर कमी करण्यात आली असेल, तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ती चुकीची गोष्ट वाटते’ अशा भावना रोहित पवारांनी व्यक्त केल्या.

शरद पवारांच्या घरातील सुरक्षा व्यवस्था मोदी सरकारने हटवली

‘शरद पवार याबद्दल बोलतीलच. महाराष्ट्राची सत्ता तुमची आहे, असं तुम्हाला वाटत असेल, पण लोकांनी जनादेश महाविकास आघाडीला दिला आहे, म्हणून तुम्हाला वाईट वाटत असेल, त्यामुळे जर सूडाचं राजकारण केलं जात असेल, तर ही चुकीची गोष्ट आहे’ असं रोहित पवार म्हणाले.

जे कोणी नेते असतील, राष्ट्रवादी, काँग्रेस, जेडीयू, शिवसेना किंवा अगदी भाजपचेही, जर ते देशासाठी महत्त्वाचे असतील, त्यांचं ज्ञान महत्त्वाचं असेल, तर त्यांना सुरक्षा दिली जावी. सूडाचं राजकारण करुन चालत नाही. ती सुरक्षा परत दिली जाईल, अशी अपेक्षा रोहित पवारांनी (Rohit Pawar on Sharad Pawar Security) व्यक्त केली.

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना (व्हीव्हीआयपी) केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे सुरक्षा व्यवस्था पुरवली जाते. संभाव्य धोक्‍याचा आढावा घेऊन त्यात बदलही केला जातो. दिल्लीत अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या निवासस्थानी दिल्ली पोलिस आणि निमलष्करी दलाच्या जवानांमार्फत सुरक्षा दिली जाते. त्यानुसार शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या ‘सहा जनपथ’मध्ये दिल्ली पोलिस आणि सीआरपीएफचे प्रत्येकी तीन जवान दिवसरात्र तैनात होते.

पवारांच्या निवासस्थानाबाहेरील सर्व सुरक्षा व्यवस्था सोमवार 20 जानेवारीपासून हटवण्यात आल्याचं समोर आलं आहे. अशाप्रकारे दिल्लीतील 40 अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेतही अचानक कपात झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे सरकारतर्फे या बदलाविषयीची कोणतीही अधिकृत माहिती किंवा पूर्वकल्पना संबंधित व्यक्तींना देण्यात आलेली नाही.

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.