शिवसेनेनंतर भाजपच्या निशाण्यावर राष्ट्रवादी, रोहित पवार म्हणाले…
फोडाफोडीचे राजकारण बघता, शिवसेनेला फोडले, नंतर शिवसेना मोठी होईलच पण आता दूसरा मोठा पक्ष हा राष्ट्रवादी कॉँग्रेस आहे असं रोहित पवार म्हणाले आहेत.
कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर : मागील आठवड्यात मंत्री शंभुराज देसाई यांनी राष्ट्रावादी पक्षाचे (NCP) काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचे म्हंटले होते. त्यातच आता राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी भाजपचा धसका घेतला का ? अशी चर्चा सुरू झाली आहे. रोहित पवार यांनी शिवसेनेनंतर (Shivsena) राष्ट्रवादी पक्ष भाजपच्या निशाण्यावर असल्याचे म्हंटले आहे. राज्यातील सत्तसंघर्षानंतर अनेक पक्षांनी भारतीय जनता पार्टीचा चांगलाच धसका घेतल्याचे दिसून येत आहे. राज्यात झालेले सत्तांतरानंतर शिवसेनेत पडलेली फुट आणि त्यानंतर भाजपमध्ये होत असलेले पक्ष प्रवेश बघता राष्ट्रवादीने धसका घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे. 2019 च्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस आणि इतर पक्षातील अनेक नेते भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करीत होते. त्यातच राज्यात पुन्हा सत्तांतर होताच पुन्हा पक्षप्रवेश सुरू झाले आहेत.
राष्ट्रावादी कॉँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत बोलत असतांना त्यांनी भाजप हा मोठा पक्ष आहे, त्यांनी दूसरा पक्ष फोडला आहे.
फोडाफोडीचे राजकारण बघता, शिवसेनेला फोडले, नंतर शिवसेना मोठी होईलच पण आता दूसरा मोठा पक्ष हा राष्ट्रवादी कॉँग्रेस आहे.
त्यामुळे फोडाफोडीचे राजकारण करायचेच असेल तर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचा ते विचार करत असतील असं रोहित पवार म्हणाले आहेत.
चौकशी ते करत राहतील आम्ही चौकशील सामोरे जाऊ, पण सामान्य लोकांचे म्हणणे आहे की हे राजकीय आरोपातून होत आहे.
याशिवाय पवार घराण्यात कुठलाही कलह नाही असे सांगत असतांना अजित दादांनी मला जिल्हा परिषदेचे तिकीट दिले, आमदारकीचे तिकीट दिले, माझं लग्न त्यांनीच जमविले अजून काय पाहिजे.
पवार साहेब नेहमीच मार्गदर्शन करीत राहतात, राष्ट्रवादी फुटणार नाही असे कळले आहे त्यामुळे घरात कलह आहे अशा चर्चा सुरू करतात.
पवार घराने आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष कधीही फुटणार नाही, दुसरे विषय बाजूला राहतात आणि पवार घराण्याच्या विषयी बोलत राहतात. पण लोकं याला कंटाळले आहे.