‘हे शेंबड्या पोरालाही माहीत…’ रोहित पवार यांचं एक ट्विट; का होतेय जोरदार चर्चा?

आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी ट्विट करत निशाणा साधला.

'हे शेंबड्या पोरालाही माहीत...' रोहित पवार यांचं एक ट्विट; का होतेय जोरदार चर्चा?
Follow us
| Updated on: Jan 13, 2025 | 6:31 PM

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे.

नेमंक काय म्हणाले रोहित पवार? 

‘व्यक्ती महागडा असला की सिस्टीम कशी झुकते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मंत्रालयातील काळी गाडी. या काळ्या गाडीच्या मालकाचे नाव आहे कुमार मोरदानी. या व्यक्तीविषयी कुठ्लाही राजकारणी किंवा अधिकारी बोलणार नाही, मिडिया देखील बोलणार नाही कारण हा व्यक्ती सर्वांची काळजी घेतो. या व्यक्तीच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या नावे ५० हून अधिक कंपन्या ministry of corporate affairs कडे नोंद असून या महागड्या व्यक्तीने अनेक बँकांना कोट्यवधींचा चुना लावला आहे.

गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये आर्थिक गुन्हे शाखेने या व्यक्तीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला होता. त्यामध्ये ग्राहकांनी ज्या प्रकल्पासाठी १९ कोटी दिले, बँकांनी ज्या प्रकल्पासाठी २०२ कोटीचे कर्ज दिले ते पैसे त्या प्रकल्पासाठी न वापरता २२१ कोटीपैकी १९६ कोटी दुसरीकडेच वळवले, शिवाय प्रकल्पाला ६ मजल्यांची परवानगी असताना १३ मजले बांधले आणि रेरा कायद्याचंही उल्लंघन केलं. एका दुसऱ्या प्रकरणात तर SRA कायद्याअंतर्गत वाढीव FSI घेतला परंतु SRA ची कामे न करता शासनाची फसवणूक केली. त्यासंदर्भात तर २०१७ मध्ये तत्कालीन विधानसभा सदस्य, विधानपरिषद सदस्यांनी सभागृहात हा मुद्दा मांडला. शासनानेही फसवणूक झाल्याचे मान्य केले, ज्या सदस्यांनी हा मुद्दा मांडला त्यापैकी ना. धनंजय मुंडे साहेब आणि ना. नितेश जी राणे हे सदस्य सध्या मंत्रिमंडळात आहेत.

ही महागडी गाडी मंत्रालयात आली तर मंत्रालयात त्यांचं कामही तेवढंच महागडं असेल. पनवेल येथे रोडलगत ११६ एकर जमीन जी जमीन पूर्वी शासनाची भोगवटा – वर्ग २ मध्ये होती, त्यासंदर्भातली फाईल क्लिअर करण्यासाठी एका मंत्र्यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. पनवेलमध्ये ११६ एकर रोडलगत जमीन म्हणजे ७०० कोटीहून अधिकच महागडा विषय आहे आणि देवाणघेवाणही महागच असेल, यात कुठलीही शंका नाही . एरवी सर्वसामान्य जनतेची नाकाबंदी करणाऱ्या मंत्रालयीन व्यवस्थेने या महागड्या गाडीला विशेषतः ज्या गाडीचा मालक शासनाची फसवणूक करण्याच्या अनेक गुन्ह्यात गुन्हेगार आहे अशा गुन्हेगाराला सर्व नियम धाब्यावर बसवून कुठलीही चौकशी न करता थेट आत सोडलेच कसे? हा प्रश्न आहे, पण ही गाडी सोडण्यासाठी एका उपमुख्यमंत्री कार्यालातून फोन आल्याचे सांगितले जात आहे.

बीड-परभणी घटनेत आरोपी कोण? आरोपीच्या जवळचे कोण? तपास कसा होतोय? हे राज्यातल्या शेंबड्या पोरालाही माहित आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनाही माहित आहे. छत्रपतींच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणारा आपटे जसा काल पुरव्याअभावी सुटला तसेच बीड-परभणी घटनेतील आरोपी देखील सुटतील. दोषींवर कारवाई होणार नाही हिच भीती अधिक आहे. कारण आरोपी धनदांडगे आहेत तर पिडीत सर्वसामान्य आहेत. मंत्रालयातल्या महागड्या गाडी प्रकरणातही ती व्यक्ती कोणत्या कामासाठी आली? कुणाला भेटली? हे सर्वांनाच माहित आहे पण कुणी बोलणार नाही कारण ती व्यक्ती धनदांडगी आणि सत्तेशी संबंधीत आहे. एकीकडे देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी राज्यभर मोर्चे निघत आहेत पण त्यांची दखल शासन घेत नाही, परंतु दुसरीकडे महागड्या गाडीच्या महागड्या मालकाचे बेकायदेशीर काम करून देण्यासाठी मंत्रालयात पायघड्या अंथरल्या जातात, हे आपल्या कायदा सुव्यवस्थेचं भीषण वास्तव आहे.’ असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.