फडणवीससाहेब, काळजी घ्या आणि कोरोनावर मात करा, रोहित पवारांकडून सदिच्छा
राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी ट्विट करुन फडणवीससाहेब लवकर बरे व्हा, अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.
मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मिडीयाद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे. त्यानंतर त्यांनी लवकर बरे व्हावे अशा मनोकामना राजकीय नेते व्यक्त करत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी ट्विट करुन फडणवीससाहेब लवकर बरे व्हा, अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. (Rohit pawar tweet After Devendra fadanvis tested Corona positive)
देवेंद्र फडणवीस साहेब काळजी घ्या आणि कोरोनावर मात करुन लवकर बरे व्हा. माझ्या सदिच्छा आपल्यासोबत आहेत, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे. फडणवीसांना कोरोनाची लागण झाल्याचं कळताच रोहित पवार यांनी सदिच्छा व्यक्त करणारं ट्विट केलं.
देवेंद्र फडणवीस साहेब काळजी घ्या आणि कोरोनावर मात करुन लवकर बरे व्हा. माझ्या सदिच्छा आपल्यासोबत आहेत.@Dev_Fadnavis https://t.co/Xumu72zd3A
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 24, 2020
दुसरीकडे भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीवासी झालेले एकनाथ खडसे यांनीही फडणवीसांना कोरोनातून बरे होण्यासाठी सदिच्छा दिल्या आहेत. काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा अशा सदिच्छा खडसेंनी व्यक्त केल्या आहेत.
तत्पूर्वी ट्विट करत देवेंद्र फडणवीसांनी त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली असून, मी स्वतःला वेगळे करून घेतले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार घेत असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला होता. बारामतीतून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली होती. पुणे, सोलापूर आणि उस्मानाबादमधील अनेक गावांना फडणवीसांनी भेटी दिल्या होत्या. या भेटीदरम्यान त्यांच्या संपर्कात अनेक नेते, गावकरी आले होते. याशिवाय त्यांनी बिहार निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारदौरेही केले होते. त्यामुळेच देवेंद्र फडणवीसांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे
आतापर्यंत माझ्या जे जे कोणी संपर्कात आले आहेत, त्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी, असा सल्लाही देवेंद्र फडणवीसांनी संपर्कात आलेल्या लोकांना दिला आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून, मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे, अशी माहिती ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
I have been working every single day since the lockdown but now it seems that God wants me to stop for a while and take a break ! I have tested #COVID19 positive and in isolation. Taking all medication & treatment as per the advice of the doctors.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 24, 2020
संबंधित बातमी
Devendra Fadnavis Corona | देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाचा संसर्ग