भुजबळांच वादग्रस्त विधान, रोहित पवारांनी मत मांडलं आणि सुरू झाला मोठा वाद

राष्ट्रवादीचे कॉँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या व्यक्तव्यावरुन नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

भुजबळांच वादग्रस्त विधान, रोहित पवारांनी मत मांडलं आणि सुरू झाला मोठा वाद
Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 29, 2022 | 11:46 AM

नाशिक : राष्ट्रवादी कोंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा सरस्वतीबद्दल विधान केले आहे. त्यामध्ये सरस्वतीने किती शाळा उघडल्या असा सवाल उपस्थित केल्याने खळबळ उडाली आहे. माजी मंत्री छगन भुजबळ यांनी यापूर्वी शाळेत सरस्वतीचाच फोटो का ? असा सवाल उपस्थित केला होता. त्यामुळे भुजबळांनी सरस्वतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे. अखिल भारतीय समता परिषदेच्या कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी ज्यांना आपण पाहिलं नाही शिकवलं नाही त्यांचा फोटो शाळेत का ? असा सवाल उपस्थित केला होता. त्यावरून राज्यभर वाद पेटला होता. आता ही पुण्यातील भिडे वाड्यातील कार्यक्रमात बोलत असतांना सरस्वतीने किती शाळा सुरू केल्या असा सवाल उपस्थित केला. यावेळी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, आंबेडकर यांनी का शाळा सुरू कराव्या लागल्या असा सवाल उपस्थित केला आहे. यावरून राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचेच समर्थन नसल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रवादीचे कॉँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या व्यक्तव्यावरुन नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

भुजबळ यांच्या व्यक्तव्यावर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचेच आमदार रोहित पवार यांनी असं विधान करणं टाळायला हवं असं म्हणत भुजबळ यांचे व्यक्तव्य ऐकलं नाही असं म्हंटलं आहे.

हे सुद्धा वाचा

यावरून भुजबळ समर्थक असलेल्या पुण्यातील सपनाताई माली शिवणकर यांनी रोहित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

रोहित पवार तुम्ही जन्माला देखील आला नव्हता तेव्हा पासून भुजबळ राजकारण करत आहेत, तुम्ही भुजबळांना सांगणार का कसे बोलायचे ते म्हणून जहरी टीका केली आहे.

खालच्या पातळीची भाषा वापरत दोन्ही कडून ढोल वाजवणे बंड करा, पुरोगामी म्हणवता ना स्वतःला मग पुरोगामी विचारांना पहिले आत्मसात करा, त्यानंतर उर बडवून सांगा जगाला असं म्हणत शिवणकर यांनी टीका केली आहे.

एकूणच भुजबळ यांनी केलेल्या विधानावरून पुन्हा एकदा वाद उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.