Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साखर कारखान्यात अडकलेला निधी परत देण्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, काहींची धरपकड

साखर संचालक कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. (protesters police aurangabad)

साखर कारखान्यात अडकलेला निधी परत देण्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, काहींची धरपकड
Follow us
| Updated on: Dec 04, 2020 | 4:13 PM

औरंगाबाद : साखर संचालक कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. तर काही आंदोलकांची पोलिसांकडून धरपकडदेखील करण्यात आली. (protesters are being caught by police in aurangabad)

गंगापूर साखर कारखान्यात अडकेली रक्कम परत मिळावी यासाठी कारखान्याचे सभासद आणि शेतकरी साखर संचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यासाठी निघाले होते. यावेळी आंदोलक क्रांती चौकात जमले असताना त्यांच्यावर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. तसेच काही आंदोलकांची धरपकडही केली.

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद शहरात साखर कारखाना संचालकांच्या कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. यावेळी मोर्चासाठी शेकडो शेतकरी तसेच सभासद आंदोलनासाठी जमले होते. या आंदोलकांकडून कारखाना सभासदांचे अडकलेले पैसे परत करण्याची मागणी जात आहे. मोर्चा काढून प्रश्न सुटत नसल्यामुळे सुरुवातीला शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. त्याचाही परिणाम झाला नाही शेवटी शेतकऱ्यांनी क्रांती चौकातील मुख्य रस्ता अडवला. यानंतर आंदोलन आणखी चिघळलं, यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करत आंदोलकांना पांगवलं. यावेळी पोलिसांनी प्रमुख आंदोलकांना ताब्यात घेतलं.

दरम्यान, हा लाठीचार्ज झाल्यानंतर आमदार प्रशांत बंब क्रांती चौकात दाखल झाले. त्यांची आणि पोलिसांमध्ये खडाजंगी झाली. (protesters are being caught by police in aurangabad)

आंदोलन कशासाठी ?

गंगापूर साखर कारखान्याची विक्री होऊ नये यासाठी सभासदांनी काही पैसे जमा केले होते. ते पुन्हा कारखान्याच्या खात्यावर आले. तेव्हा ही रक्कम 15 कोटी 75 लाख होती. मात्र, खात्यावर आलेल्या या पैशांचा कारखान्याशी काहीही संबंध नाही असं कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत बंब आणि त्यांच्या काही संचालकांनी सांगितलं. यामुळे सभासदांनी एकत्र येत पैशांचा अपहार केल्याचा आरोप आहे. सभासदांनी जमा केलेला हाच निधी परत मिळावा म्हणून शेतकरी तसेच कारखान्याचे सभासद यांच्याकडून औरंगाबादेतील क्रांतीचौकात आंदोलन सुरू होते. यावेळी आंदोलन करताना त्यांच्यावर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आहे. तसेच काही आंदोलकांची धरपकड सुरु केली आहे.

संबंधित बातम्या :

‘कारखाना सुरु होऊ नये म्हणून छळ, विरोधक बिनडोक’, गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रशांत बंब यांची टीका

बीएमसी निवडणूक भाजप स्वबळावर लढणार, मनसेबाबत विचार करु : प्रवीण दरेकर

देशभरात तरुणांची भाजपला पसंती; पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत हाच ट्रेंड दिसेल: दरेकर

शिवसेनेकडून मुंबईचं वाटोळं करण्याचं पाप; प्रवीण दरेकर यांची टीका

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.