रामदास आठवलेंनी घेतला बिबळ्या पँथर दत्तक

त्यामुळेच आम्ही हा पँथर दत्तक घेतला, असेही रामदास आठवले म्हणाले. (Ramdas Athawale adopt Biblia Tiger)

रामदास आठवलेंनी घेतला बिबळ्या पँथर दत्तक
Follow us
| Updated on: Feb 16, 2021 | 12:16 AM

मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राजयमंत्री रामदास आठवले यांनी आज बिबळ्या वाघ दत्तक घेतला आहे. मुंबईच्या बोरिवली नॅशनल पार्क येथे रामदास आठवलेंनी हा बिबळ्या वाघ पँथर दत्तक घेतला. पर्यावरण रक्षणासाठी, निसर्ग संवर्धनासाठी आणि प्राणिप्रेम जोपासण्याचा संदेश देण्यासाठी आपण बिबळ्या वाघ (पँथर) दत्तक घेतला आहे, अशी प्रतिक्रिया रामदास आठवलेंनी दिली. (Ramdas Athawale adopt Biblia Tiger)

निसर्ग साखळी टिकविण्यात बिबळ्या वाघाचा महत्वाची भूमिका असते. माझे नेतृत्व भारतीय दलित पँथर मधून पुढे आले आहे. अमेरिकेत जशी ब्लॅक पँथर तर तशी भारतात दलित पँथर ही संघटना होती. दलित पँथरपासून आम्हाला पँथरबद्दल विशेष प्रेम आहे. त्यामुळेच आम्ही हा पँथर दत्तक घेतला, असेही रामदास आठवले म्हणाले.

या पँथरचे नाव ‘सिंबा’ असे ठेवण्यात आले आहे, अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली. यावेळी रामदास आठवले यांच्या पत्नी सीमाताई आठवले, जित आठवले, बहिण शकुंतला आठवले उपस्थित होते.

रामदास आठवलेंकडून कार्यकर्त्यांना आदेश 

मुंबई महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा एक ही उमेदवार निवडून आला नाही. या लाजिरवाण्या पराभवाचा इतिहास पुसून टाकण्यासाठी येत्या 2022 मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत रिपाईचे किमान 25 उमेदवार निवडून आणण्यासाठी तयारीला लागा, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काही दिवसांपूर्वी केले होते.

आगामी मुंबई मनपा निवडणुकीत शिवसेना; राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी एकत्र आव्हान उभे करेल. त्यांच्या विरुद्ध भाजप आणि आरपीआय युती करून लढेल. भाजपचा महापौर आणि आरपीआयचा उपमहापौर करण्यासाठी भाजपसोबत आरपीआयचे उमेदवार निवडून आणणे आवश्यक आहे. यासाठी आपापले वॉर्ड निश्चित करुन आतापासून कार्यकर्त्यांनी निवडणुकीची तयारी करावी, असे आदेश रामदास आठवले यांनी दिले आहेत. (Ramdas Athawale adopt Biblia Tiger)

संबंधित बातम्या : 

आगामी मुंबई महापालिकेत 25 उमेदवार निवडून आणण्यासाठी तयारीला लागा, रामदास आठवलेंचे आदेश

शरद पवारांच्या त्या गंभीर आरोपांना रामदास आठवले यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, चौकशी झालीच पाहिजे!

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.