साडेसातशे किमी प्रवास, रुपाली चाकणकर कार्यकर्त्याच्या लग्नासाठी थेट विदर्भातून बारामतीत
महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर कार्यकर्त्याच्या लग्नासाठी थेट विदर्भातून बारामतीत गेल्या आहेत.(Rupali Chakankar Attend Party Worker Wedding)
बारामती : राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर कार्यकर्त्याच्या लग्नासाठी थेट विदर्भातून बारामतीत गेल्या आहेत. यासाठी रुपाली चाकणकर यांनी साडेसातशे किमी प्रवास केला आहे. यानंतर अनेक कार्यकर्त्यांना आश्चर्याचा धक्का मिळाला आहे. (Rupali Chakankar Attend Party Worker Wedding)
नेत्यांसाठी कार्यकर्ते किती काय काय करतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मात्र याची जाणीव क्वचितच नेत्यांना असते. त्यातूनच हे नेते आपल्या कार्यकर्त्यांसाठी काहीतरी वेगळं करताना दिसतात. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर या राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमानिमित्त विदर्भात आल्या होत्या. यानंतर त्यांनी एका कार्यकर्त्याच्या लग्न सभारंभासाठी बारामतीत हजेरी लावली. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. विशेष म्हणजे लग्नानंतर त्या पुन्हा या संवाद दौऱ्यासाठी रवाना झाल्या.
रुपाली चाकणकर यांच्या सोशल मीडियाची जबाबदारी सांभाळणाऱ्या विकास धायगुडे याचा विवाह आज बारामतीत पार पडला. रुपाली चाकणकर या राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमानिमित्त विदर्भात होत्या. त्यामुळे त्या लग्न समारंभाला उपस्थित राहतील याबाबत सर्वांनाच साशंकता होती. मात्र त्यांनी विदर्भातून बारामतीत येत या विवाहसोहळ्याला हजेरी लावत सर्वांना अचंबित केलं.
अगदी घरातील लग्न असल्याप्रमाणे त्यांनी या विवाह सोहळ्यात सहभाग घेत नवविवाहितांना शुभाशिर्वाद दिले. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्यानंतर त्या आपल्या पुण्यातील निवासस्थानी न जाता थेट विदर्भाकडे रवाना झाल्या.
एरवी लग्न सोहळ्यांमध्ये आपला प्रतिनिधी पाठवून संबंधित कुटुंबियांना खूश करण्याचा अनेक राजकीय नेते प्रयत्न करतात. मात्र रुपाली चाकणकर यांनी विदर्भ दौऱ्यातून वेळ काढत कार्यकर्त्याच्या लग्नाला हजेरी लावली. यासोबतच विवाह सोहळा पार पडल्यानंतर त्या पक्षाच्या दौऱ्यात सहभागी होण्यासाठी विदर्भाकडे रवाना झाल्या.
एकूणच त्यांच्या आजच्या कृतीतून कार्यकर्त्यावरचं प्रेमासह पक्षाच्या कामावरील निष्ठा या दोन्ही बाबी दिसून आल्या. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. (Rupali Chakankar Attend Party Worker Wedding)
‘माझी भूमिका तीच फडणवीसांचीही’, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मुनगंटीवारांकडून स्पष्ट https://t.co/SZ8sktfXvK @SMungantiwar @OfficeofUT @Dev_Fadnavis @bb_thorat @AjitPawarSpeaks @BJP4Maharashtra @ShivSena #sudhirmungantiwar #uddhavthackeray #DevendraFadnavis
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 2, 2021
संबंधित बातम्या :
मध्यरात्री स्टिअरिंग हाती, यवतमाळमध्ये जयंत पाटलांची युवा पदाधिकाऱ्यांसोबत लाँग ड्राईव्ह
आठवलेंच्या ‘र ला र – ट ला ट’ कवितांवरुन शेरेबाजी, चाकणकरांच्या घरावर रिपाइंच्या महिला आघाडीचा मोर्चा