Amarnath Cloudburst: अमरनाथ येथे झालेल्या ढगफुटीच्या घटनेत पुण्यातील महिलेचा मृत्यू; महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची माहिती

धायरीतील महेश भोसले (Mahesh Bhosale), सुनीता भोसले आणि आणखी एक कुटुंबीय असे तिघे पुण्यातून अमरनाथ यात्रेला निघाले होते. मात्र अद्याप त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. पुणे जिल्हा प्रशासनातर्फे भोसले कुटुंबियांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशातच सुनिता महेश भोसले यांचा मृत्यू झाल्याचे ट्विट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

Amarnath Cloudburst: अमरनाथ येथे झालेल्या ढगफुटीच्या घटनेत पुण्यातील महिलेचा मृत्यू; महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची माहिती
Follow us
| Updated on: Jul 09, 2022 | 5:40 PM

पुणे : पिंपरी-चिंचवड : शुक्रवारी सायंकाळी अमरनाथ (Amarnath cloudburst) गुहेजवळ ढगफुटी सदृश्य पावसामुळे झाल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणचे भाविक यात सहभागी झाले होते. यापैकी अनेक जण बेपत्ता झाले असताना पुण्यातील एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अमरनाथ येथे झालेल्या ढगफुटीच्या घटनेत पुण्यातील एका महिला यात्रेकरुचा मृत्यू झाल्याचा माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर(Rupali Chakankar) यांनी दिली आहे.

धायरीतील महेश भोसले (Mahesh Bhosale), सुनीता भोसले आणि आणखी एक कुटुंबीय असे तिघे पुण्यातून अमरनाथ यात्रेला निघाले होते. मात्र अद्याप त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. पुणे जिल्हा प्रशासनातर्फे भोसले कुटुंबियांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशातच सुनिता महेश भोसले यांचा मृत्यू झाल्याचे ट्विट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

#अमरनाथ यात्रेदरम्यान ढगफुटीमुळे फार मोठे संकट उभे राहिलेले आहे.महाराष्ट्रातून अनेक भाविक दर्शनासाठी गेलेले आहेत.या भाविकांमध्ये आमच्या धायरी परिसरातील तीन भाविक त्यामध्ये महेश राजाराम भोसले,सुनिता महेश भोसले,प्रमिला प्रकाश शिंदे हे सहभागी झालेले होते. या ढगफुटी दरम्यान दरड कोसळल्याने सुनिता महेश भोसले यांचे दुःखद निधन झालेले आहे.ही माहिती समजतात त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधून भेट घेतलेली आहे.काल या सर्व सदस्यांचा आपल्या अमरनाथ येथे असलेल्या सदस्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क झाला होता अलसे ट्वीट रुपाली चाकणकर यांनी केले आहे. 

यासंदर्भात तातडीने आरडीसी बरोबर संपर्क साधून तसेच भोसले कुटुंबियांचा अमरनाथ येथील आपल्या सदस्यांचा संपर्क करून देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि योग्य ती संपूर्ण मदत देण्यासाठी आम्ही निश्चितपणाने तत्पर आहोत असेही चाकणकर यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे. 

शुकवारी संध्याकाळी 5. 30 च्या सुमारास हा सगळा प्रकार घडला. ज्यावेळी ढगफुटी झाली त्यावेळी गुफेजवळ 10 ते 15 हजार भाविक उपस्थित होते. ढगफुटीनंतर सिंध नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यानंतर एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या घटनास्थळी पोहचल्या आणि त्यांनी तात्काळ बचावकार्य सुरु केले. पावसामुळे जवानांना मदत कार्यात अडथळे येत आहेत.

अमरनाथ ढगफुटी दुर्घटनेनंतर आळंदीचे सात जण बेपत्ता?

अमरनाथ येथे शुक्रवारी झालेल्या ढगफुटीच्या घटनेनंतर मोठी जिवीत हानी झाली आहे. आत्तापर्यंत या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती असून, 40 बेपत्ता असल्याची माहिती आहे. याच काळात आळंदीतून आलेले सात यात्रेकरु बेपत्ता झाल्याची माहिती आहे. आळंदीमधील गुरू कृपा यात्रा कंपनीच्या माध्यमातून 200 यात्रेकरू अमरनाथ यात्रेत सहभागी झाले होते. त्यातील सात जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. मात्र, त्यांना या घटनेनंतर पाहिले असल्याचा दावा यात्रा कंपनीच्या चालकाने केला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.