Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rupali Chakankar | 'विरोधकांकडे कोणतेच मुद्दे नाहीत, म्हणूनच खालच्या पातळीवर जाऊन वारंवार टीका'

Rupali Chakankar | ‘विरोधकांकडे कोणतेच मुद्दे नाहीत, म्हणूनच खालच्या पातळीवर जाऊन वारंवार टीका’

| Updated on: Mar 12, 2022 | 4:06 PM

विरोधकांकडे आरोप करण्यासाठी कोणतेही मुद्दे नाहीत. म्हणूनच खालच्या पातळीवर जाऊन वारंवार टीका होतेय, अशी प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिली.

कोरोना (Corona) काळात किती चांगलं काम केलं जाऊ शकतं हे महाविकास आघाडीनं (Mahavikas Aghadi) दाखवून दिलं. विरोधकांकडे आरोप करण्यासाठी कोणतेही मुद्दे नाहीत. म्हणूनच खालच्या पातळीवर जाऊन वारंवार टीका होतेय, अशी प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिली. त्या पुढे म्हणाल्या, की कोणतेही पुरावे हातात नसताना टीका करत सुटले आहेत. त्यांच्या मानसिक नैराश्येचं हे लक्षण आहे. महाविकास आघाडी काम करत असताना त्याला जनतेनंही साथ दिली. पण विरोधकांना हे सहन होत नाही. त्यामुळे हाती काहीही नसताना टीका करायची, जनतेमध्ये संभ्रम निर्माण करायचा, हा कार्यक्रम सुरू असल्याची टीका त्यांनी केली. बालविवाहाच्या मुद्द्यावरही त्यांनी मत व्यक्त केले. महाराष्ट्रात बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे. कोरोनानंतर आलेली परिस्थिती याला कारणीभूत आहे. बालविवाह करणाऱ्या आई-वडिलांबरोबरच आता ग्रामपंचायत सदस्यांवरही कारवाई केली जाणार आहे. कारवाईमध्ये त्यांचे सदस्यत्व आणि पद रद्द करण्याची मागणी राज्य महिला आयोगामार्फत राज्य शासनाकडे केलीय, असे त्यांनी सांगितले.