Video : चंद्रकांत पाटलांनी बुद्धीचा आवाका वाढवावा, रुपाली चाकणकरांनी दादाचं बौद्धिकही काढलं

चंद्रकांत दादा पाटील बोलतात कमी आणि बरळतात जास्त. बौद्धिक पद्धतीने विरोध करता येत नाही. त्या वेळी भाजपाचे लोक कुटुंबावर उतरतात. चंद्रकांत दादा देखील हीच परंपरा पुढे नेत आहेत, असे म्हणत त्यांनी चंद्रकांत पाटलांचं बौधिकच काढलं आहे. त्यामुळे हा वाद आता वाढण्याची शक्यता आहे.

Video : चंद्रकांत पाटलांनी बुद्धीचा आवाका वाढवावा, रुपाली चाकणकरांनी दादाचं बौद्धिकही काढलं
रुपाली चाकणकरांची चंद्रकांत पाटलांवर खरपूस टीका
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 10:11 PM

नदुरबार : वाईन विक्रीच्या (Wine In kirana) निर्णयावरून चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि रुपाली चाकणकर (Rupali Chakankar)आमनेसामने आले आहेत. रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. रुपाली चाकणकर यांनी वाईनसंदर्भात महिलांची कोणतीही तक्रार आली नाही असं विधान केलं. त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी त्यावर टीका केली. रुपालीताई तुम्ही सुसंस्कृत घरातल्या आहेत. तुम्ही म्हणताय तक्रार नाही आली. मी आता घरातल्या महिलांना जाऊन याबद्दल विचारतो. तुम्हाला वाईन चालणार आहे का? असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी टिका केली. तसेच रुपाली चाकरणकर या राजकीय पक्षाच्या पदाधिकारी आहेत. त्या संबंधातील काही लोकांचा फायदा व्हावा म्हणून बोलू नका. छातीठोकपणे म्हणा आमचा वाईनला विरोध आहे. असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगवाला. त्यावरून रूपाली चाकणकर आता चांगल्याच भडकल्या आहेत. चंद्रकांत दादा पाटील बोलतात कमी आणि बरळतात जास्त. बौद्धिक पद्धतीने विरोध करता येत नाही. त्या वेळी भाजपाचे लोक कुटुंबावर उतरतात. चंद्रकांत दादा देखील हीच परंपरा पुढे नेत आहेत, असे म्हणत त्यांनी चंद्रकांत पाटलांचं बौधिकच काढलं आहे. त्यामुळे हा वाद आता वाढण्याची शक्यता आहे.

पाटलांनी बौधिक पातळी वाढवावी-चाकणकर

चंद्रकांत पाटलांवर त्या एवढेच बोलून थाबल्या नाहीत. त्यांनी चंद्रकांत दादांनी वेळेचा सदुपयोग करावा आणि बुद्धीचा आवाका वाढवावा. मी पत्रकार परिषदेत बोललेल्या आणि मला विचारन्यात आलेल्या प्रश्नांचा अभ्यास करूनच त्यांनी प्रतिक्रिया दिली असती तर बरं झालं असतं. असा टोलाही त्यांनी लगावला आहे. तसेच त्यांनी पुणे महानगर पालिकेतील नगरसेवकांवरून फडणवीसांचाही चांगलाच समाचार घेतला आहे. सेना गोळा करून ठेवण्यासाठी फडणवीस असं बोलत आहेत. येणाऱ्या काळात त्यांना ही कळेल सत्ता कोणाची असेल. असे म्हणत त्यांनी फडणवीसांवरही तोफ डागली आहे. सध्या पुणे महापालिका निवडणुकीच्या तोडंवर नगरसेवकांच्या पळवापळवीवरून राजकारण तापलं आहे. कधी पुण्यात राष्ट्रवादी भाजपचे नगरसेवक फुटण्याचा दावा करते. तर कधी भाजप राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याची भाषा करतं.

किरीट सोमय्यांचाही चाकणकरांकडून समचार

भाजप नेते किरीट सोमय्या यांना झालेल्या पुण्यातल्या धक्काबुक्कीचे प्रकरण दिल्लीत गेले आहे. त्यावरून रोज आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. ज्या पायऱ्यावर सोमय्यांना धक्काबुक्की झाली, त्या पायऱ्यावर उद्या सोम्मयांचा सत्कार होणार आहे. त्याच्या आधी आज काँग्रेसने या सत्काराला विरोध केला आहे. रुपाली चाकणकर यांनीही आज बोलताना सोमय्यांवर निशाणा साधला आहे. विरोधकांनी ज्या वेळेस महाराष्ट्रात गरज होती, त्यावेळेस त्यांनी लक्ष दिलं नाही. महाराष्ट्रातील माणूस बिकट परिस्थितीतून जातो आहे. त्यावेळेस केंद्रात भाजपची सत्ता असताना खऱ्या अर्थाने तेव्हा मदत करण्याची गरज होती. मात्र विरोधी पक्षांनी काही केलं नाही फक्त आरोप करत असतात, असे म्हणत त्यांनी या प्रकणावरून खोचक टोला लगावला आहे.

VIDEO: औरंगाबादेत विधानसभेवर एकही निवडून येत नाही, ही मोठी खंत, Ajit Pawar यांनी मराठवाड्यासाठी टार्गेटच ठरवलं!

चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘अजित पवारांनी जमिनी लाटण्याचं काम केलं’, आता दादांचं थेट उत्तर

Fact Check : पंतप्रधान मोदींना हृदयनाथ मंगेशकरांबद्दल चुकीची माहिती? आकाशवाणीतून मंगेशकरांना खरंच काढून टाकलं होतं?

दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.