डी वाय पाटलांचा 29 वर्षांचा नातू, 2 कोटींची पोर्शे, एकूण संपत्ती वयापेक्षा जास्त कोटींची!
ऋतुराज पाटील (Ruturaj Patil property) हे डी वाय पाटील (D Y Patil) यांचे नातू आणि संजय पाटील यांचे सुपुत्र आहेत.
कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर आमदार सतेज पाटील (MLA Satej Patil) यांचे पुतणे ऋतुराज पाटील (Ruturaj Patil property) हे रिंगणात उतरले आहेत. ऋतुराज पाटील (Ruturaj Patil property) हे डी वाय पाटील (D Y Patil) यांचे नातू आणि संजय पाटील यांचे सुपुत्र आहेत. डी वाय पाटील या नावावरुनच त्यांच्या संपत्तीची कल्पना केलेली बरी. ऋतुराज पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला. जमीन जुमला, ठेवी, गाड्या, दागदागिने अशी कोट्यवधीची संपत्ती ऋतुराज पाटील यांच्या नावे आहे.
29 वर्षीय ऋतुराज पाटील विवाहित आहेत. त्यांच्याकडे 4 लाखांची दुकाटी बाईक आहे. भारदस्त पोर्शे आणि फोर्ड या दोन कार ऋतुराज पाटील यांच्या ताफ्यात आहेत. पोर्शे या कारची किंमत तब्बल 2 कोटी 62 लाख 33 हजार 257 इतकी आहे. तर फोर्डची किंमत 27 लाख रुपये आहे. ऋतुराज पाटील यांनी आपल्यावर एकही गुन्हा दाखल नसल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.
ऋतुराज पाटील यांची संपत्ती?
गाड्या –
- दुकाटी – 4 लाख 1 हजार 320
- सुझुकी बाईक – 55 हजार 787
- पोर्शे कार – 2 कोटी 62 लाख 33 हजार 257
- फोर्ड – 27 लाख
सोने दागिने
- सोने – 4 लाख 65 हजार 131
- हिरे – 4 लाख 60 हजार 635
शेतजमीन, घर, इमारती
- एकूण बाजारमूल्य – 11 कोटी 47 लाख 7 हजार 297
उसणे दिलेले पैसे/दिलेले कर्ज
- हॉटेल सयाजी – 11 लाख 64 हजार 840
- डी वाय पी हॉस्पिटल – 42 लाख 72 हजार
- गजानन अग्रो फार्मर – 13 कोटी 95 लाख 27 हजार 999
- भाऊ पृथ्वीराज पाटील – 1 कोटी 72 लाख 60 हजार
ऋतुराज पाटील यांची संपत्ती
ठेवी, रोख रक्कम, शेअर्स – 22 कोटी 88 लाख 58 हजार 140
घर, जमीन जुमला – 11 कोटी 47 लाख 07 हजार 297
एकूण संपत्ती -34 कोटी 35 लाख 65 हजार 437
कोल्हापूर दक्षिण विधानसभा
कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्यात हाय-टेन्शन मतदार संघ म्हणून कोल्हापूर दक्षिण (Kolhapur South) या मतदार संघाकडे पाहिलं जातं. कारण याठिकाणी पारंपरिक शत्रू असलेले महाडिक गट आणि सतेज पाटील (Satej Patil) गट समोरासमोर आहेत . 2014 मधील विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐनवेळी उमेदवारी दिलेले अमल महाडिक यांनी तत्कालिन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा पराभव करत मोठा धक्का दिला होता. यंदा सतेज पाटील विधानपरिषदेवर आहेत. त्यामुळे काँग्रेसने त्यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांना उमेदवारी दिली आहे. ऋतुराज पाटील विरुद्ध भाजपचे विद्यमान आमदार अमल महाडिक यांच्यात लढत होत आहे.