गोपीचंद पडळकर यांना सचिन खरात यांचं ओपन चॅलेंज, ‘त्या’ वाड्याचे नाव होळकरवाडा करून दाखवा
अहमदनगर शहराचे नाव अहिल्यानगर करा अशी मागणी करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांना आरपीआयच्या सचिन खरात यांनी एक खुलं आव्हान दिलं आहे.
कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगरचे नामांतर करून अहिल्यानगर करावे अशी मागणी केली होती. त्यावरून राज्य सरकारने अहमदनगर पालिकेला ठराव करून पाठवण्याचे निर्देश दिले आहे. त्यावरून अहमदनगर शहराचे नामांतर व्हावे यासाठी हालचाली सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यावरून गोपीचंद पडळकर यांच्यावर आरपीआयच्या सचिन खरात यांनी पडळकर यांच्यावर निशाणा साधला आहे. यामध्ये सचिन खरात यांनी यामध्ये गोपीचंद पडळकर यांनी खुलं आव्हान दिलं आहे. यामध्ये गोपीचंद पडळकर हिम्मत असेल तर शनिवारवाड्याचे नाव होळकरवाडा करा अशी मागणी राज्य सरकारला करा असं सचिन खरात यांनी म्हंटलं आहे. अहमदनगरमध्ये नामांतरावरुन सुरू असलेला वाद थेट विभाजन करण्यापर्यंत गेला आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात सुरू असलेल्या नामंतराच्या मुद्द्यावरून खरात यांनी पडळकर यांना थेट आवाहन केल्यानं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
सचिन खरात यांनी पडळकर यांना आव्हान करत असतांना म्हंटलय, गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यानगर जिल्हा करा अशी मागणी केली.
गोपीचंद पडळकर आपण ज्या धनगर समाजातून येत आहात त्या धनगर समाजाचा थोडा अभ्यास करा याच धनगर समाजाला फार मोठा ज्वाजल्य इतिहास आहे.
पुणे येथील हडपसर मध्ये 1802 साली होळकर आणि दुसरा बाजीराव पेशवा यामध्ये युद्ध झाले आणि या युद्धामध्ये होळकरांचा विजय झाला.
पुढे दुसरा बाजीराव पेशवा हा कोकणामध्ये पळून गेला, याच दरम्यान होळकरांचा ताबा शनिवारवाड्यावर होता.
त्यामुळे गोपीचंद पडळकर तुम्हाला धनगर समाजाविषयी थोडी जरी आपुलकी असेल तर आणि हिम्मत असेल तर शनिवारवाड्याचे नाव होळकरवाडा करा अशी मागणी राज्य सरकारला करा.
असं आव्हान सचिन खरात यांनी केले असून थेट पडळकरांना अडचणीत आणणारे हे आव्हान आहे. त्यामुळे खरात यांचे आव्हान पडळकर स्वीकारतात का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.