भाजपासून सत्यजित तांबे यांना लांब राहण्याचा सल्ला कुणी दिला, कोणत्या नेत्यानं सत्यजित तांबे यांना दिला सल्ला

सत्यजित तांबे यांनी गुरुवारी अखेरच्या क्षणी अपक्ष म्हणून नाशिक पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यावरून हा सल्ला एका राजकीय नेत्याने दिला आहे.

भाजपासून सत्यजित तांबे यांना लांब राहण्याचा सल्ला कुणी दिला, कोणत्या नेत्यानं सत्यजित तांबे यांना दिला सल्ला
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 13, 2023 | 10:36 AM

कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर : कॉंग्रेसचे युवा प्रदेशअध्यक्ष सत्यजित तांबे यांनी नुकताच विधानपरिषदेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सुधीर तांबे यांनी कॉंग्रेसचा एबी फॉर्म आलेला असतांनाही अर्ज दाखल न केल्याने आणि भाजपने कुणालाही एबी फॉर्म न दिल्याने सत्यजित तांबे यांच्या भूमिकेवर संशय घेतला जात आहे. त्याचे कारण म्हणजे एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बाळासाहेब थोरात यांना देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित तांबे यांना असं किती दिवस बाहेर ठेवणार? चांगल्या माणसांवर आमचा डोळा आहे असं म्हंटलं होतं. त्यावरून सत्यजित तांबे यांना भाजपचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चा सुरू असून भाच्याने सर्वांना मामा बनविल्याची टीका होऊ लागली आहे. याशिवाय भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची ही राजकीय खेळी तर नाही ना? असा तर्क लावत उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. त्यावरून आरपीआयच्या सचिन खरात यांनी सत्यजित तांबे यांना एक सल्ला दिला आहे.

सत्यजित तांबे आपण फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराचे नेतृत्व, त्यामुळे भाजपापासून दोन हात लांब रहा असे सचिन खरात यांनी म्हंटले आहे.

सत्यजित तांबे यांनी गुरुवारी अखेरच्या क्षणी अपक्ष म्हणून नाशिक पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

हे सुद्धा वाचा

परंतु हा फॉर्म अपक्ष अर्ज दाखल केला आहे. सत्यजित तांबे आपण महाराष्ट्र राज्यामध्ये युवक काँग्रेसचे अध्यक्ष असतानाचा दाखला सचिन खरात यांनी दिला आहे.

महाराष्ट्र राज्यातील रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजी राजे, फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार पुढे नेण्यासाठी प्रामाणिकपणे काम केले आहे.

परंतु भारतामध्ये आता फुले, शाहू, आंबेडकर विचार विरुद्ध गोळवळकर, हेडगेवार विचारांची लढाई चालू आहे आणि सत्यजीत तांबे तुम्ही तर फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराचे नेतृत्व आहात.

त्यामुळे भाजपपासून दोन हात लांब राहावे असं आवाहन करत आहे, असं आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे सचिन खरात यांनी केलं आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.