मंदिराचे टाळे दरोडेखोर तोडतात, वारकरी शिस्तप्रिय : ह.भ.प. सचिन पवार

वारकरी संप्रदायाचे मुखपत्र असलेल्या 'वारकरी दर्पण'चे संपादक ह.भ.प. सचिन पवार यांनी राज्यातील मंदिरांचे टाळो तोडण्याची भाषा करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

मंदिराचे टाळे दरोडेखोर तोडतात, वारकरी शिस्तप्रिय : ह.भ.प. सचिन पवार
Follow us
| Updated on: Nov 03, 2020 | 5:23 PM

पुणे : वारकरी संप्रदायाचे मुखपत्र असलेल्या ‘वारकरी दर्पण’चे संपादक ह.भ.प. सचिन पवार यांनी राज्यातील मंदिरांचे टाळो तोडण्याची भाषा करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “मंदिराचे टाळे दरोडेखोर तोडतात, वारकरी शिस्तप्रिय आहेत. आम्ही टाळ वाजवू, पण टाळे तोडणार नाही. वारकरी नसणाऱ्या माणसांनी वारकरी संप्रदायाबद्दल बोलू नये,” असं मत सचिन पवार यांनी व्यक्त केलं आहे. यावेळी त्यांनी काही लोक वारकऱ्यांचा वापर करुन मंदिरांचे टाळे तोडण्याची भाषा करत असल्याचा आरोपही केला (Sachin Pawar Varkari Community oppose Acharya Tushar Bhosale on Temple Reopening).

वारकरी संप्रदायाचे अभ्यासक ह.भ.प. सचिन पवार म्हणाले, “कार्तिक वारी तोंडावर आली आहे. कोरोना काळात प्रशासनाने योग्य वारकरी प्रतिनिधींशी चर्चा करुन स्वरूप ठरवलं पाहिजे. प्रशासन वारकऱ्यांच्या योग्य प्रतिनिधींशी चर्चा करत नाही. त्यामुळे प्रशासन आणि वारकरी यांच्यात दुरावा निर्माण होतोय. वारकऱ्यांचा वापर करुन काही लोकांकडून मंदिरांचे टाळे तोडण्याची भाषा केली जात आहे. मात्र, ही वारकरी संप्रदायाची भाषा नाही. वारकऱ्यांची भाषा मृदू आणि सर्वसमावेशक आहे. वारकरी हे जाती भेदाच्या विरोधात असतात. महाराष्ट्रातील वारकरी जातीयवादी झालेला, राजकारणी झालेला संतांनाही आवडत नाही आणि लोकांनाही मान्य होत नाही.”

“मंदिर उघडली गेली पाहिजेत हे आमचंही म्हणणं आहे. ती उघडण्याची पद्धत ही वारकरी पद्धत असली पाहिजे. चुकीच्या प्रवृत्तीची काही लोकं वारकरी असल्याचं भासवत आहेत ही वस्तुस्थिती आहे. कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन वागलं पाहिजे. वारकऱ्यांनी कोणत्याही आक्रस्ताळेपणा करणाऱ्या लोकांच्या नादी न लागता संयमी भूमिका घेतली पाहिजे. वारकऱ्यांच्या प्रतिमेला धक्का लागणार नाही याची काळजी वारकऱ्यांनी घेतली पाहिजे,” असंही आवाहन यावेळी त्यांनी वारकऱ्यांना केलं आहे.

“आचार्य तुषार भोसले यांच्या भंपकपणामुळे मंदिरं उघडण्याचा विषय चिघळला आहे. कार्तिक वारी संदर्भात वारकरी नेत्यांनी भोसले यांच्या पध्दतीने न जाता वारकरी पध्दतीने हा विषय मांडायला हवा. प्रगल्भ, निष्ठावंत वारकरी नेत्यांनी पुढे यायला हवे. विषय वारकऱ्यांचे, साऱ्या आंदोलनाला बळ वारकऱ्यांचे, मात्र चमकोगिरी भलत्यांची हे खपवून घेतले तर वारकऱ्यांचे प्रश्न कधीच सुटणार नाही,” असा इशाराही सचिन पवार यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या :

मंदिरे उघडण्याच्या मागणीवरुन भाजप अध्यात्मिक आघाडी पुन्हा आक्रमक, राज्यपालांची भेट, मंदिरांचे टाळे तोडण्याचा इशारा

भाजपचं आंदोलन, राज्यपालांचं पत्र, तरीही ठाकरे सरकार ठाम, देऊळ बंदच!

मंदिरात जाणारे भक्त लाखो, दारुच्या दुकानात रांगेतून प्रवेश, अमृता फडणवीसांना विद्या चव्हाणांचे उत्तर

संबंधित व्हिडीओ :

Sachin Pawar Varkari Community oppose Acharya Tushar Bhosale on Temple Reopening

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.