“शेजाऱ्याला पोरगं झालं की तुम्ही पाळणा हालवणार का ?,”मोफत लसीकरणावरून सदाभाऊ खोत यांची बोचरी टीका

रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर बोचरी टीका केली. (sadabhau khot sharad pawar corona vaccination)

शेजाऱ्याला पोरगं झालं की तुम्ही पाळणा हालवणार का ?,मोफत लसीकरणावरून सदाभाऊ खोत यांची बोचरी टीका
सदाभाऊ खोत, रयत क्रांती संघटना
Follow us
| Updated on: Apr 25, 2021 | 11:25 PM

सातारा : राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांना थोपवण्यासाठी राज्यात येत्या 1 मे पासून राज्य पातळीवर लसीकरणाचा (Corona vaccination drive) कार्यक्रम राबवला जाणार आहे. यामध्ये 18 वर्षावरील सर्वांना मोफत कोरोना लस दिली जाणार आहे. तसे संकेत राज्यातील मंत्र्यांनी दिले आहेत. मात्र, याच मुद्द्याला घेऊन रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी सरकारवर बोचरी टीका केली. “शेजाऱ्याला पोरगं झालं की तुम्हा पाळणा हालवणार का,” अशा शेलक्या शब्दांचा वापर असं सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केलाय. खोत यांनी आज साताऱ्यातील जंम्बो कोविड सेंटर आणि शेजारीच नव्याने सुरु होणारे 78 बेडच्या कोरोना केअर सेंटरची अचानक पाहणी केली. यावेळी त्यांनी वरील भाष्य केले. (Sadabhau Khot criticizes Maharashtra government and Sharad Pawar on Corona and Corona vaccination drive)

सदाभाऊ खोत काय म्हणाले ?

“राज्य सरकार सगळी मदत केंद्राकडून मागत आहेत. रेमडेसिव्हीर केंद्राककडून, ऑक्सिजन केंद्राने, लस केंद्राने, व्हेंटीलेटर केंद्राने, मग तुम्ही काय करताय. आज एक घोषणा पाहिली की 18 ते 45 वयोगटातल्या सर्वांना मोफत लस देणार. हे तर केंद्राने जाहीर केलं. शेजाऱ्याला पोरगं झालं की तुम्ही पाळणा हालवणार का ?,” असे खोत म्हणाले.

शरद पवार यांच्यावर निशाणा

यावेळी पुढे बोलताना त्यांनी राज्यसरकार तसेच शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. “राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी सर्व साखर कारखाने कोरोना हॉस्पिटल उभारणार असल्याचे सांगितले. ही मात्र एकाही कारखान्याने हॉस्पिटल उभारले नाही. आता कारखाने ऑक्सिजन पुरवणार असं म्हणतायत. म्हणजे देहूच्या आळंदीला जायचं सोडून चोराच्या आळंदीला पोहचलेल्या लोकांनी सांगायचं पाकीट मारलेले पैसे परत दिले जाणार आहेत. असं कुठं घडू शकतं का” अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.

मंत्र्यांनी ठेकेदारांना जगवण्याचं काम केलं

“राज्यात कोरोनाच्या महामारीमुळे बेड उपलब्ध नाहीत,लोकांना ऑक्सिजन मिळत नसल्याने ते तडफडून मरत असताना राज्यसरकार काहीच करत नाहीये. राज्यातील आमदारांनी DPDC च्या माध्यमातून मिळालेले 20 कोटी आपल्या मतदार संघात आणले. तसेच ठेकेदारांकडून कमिशन खाऊन ठेकेदारांना जगवण्याचं काम केलं,” असे म्हणत त्यांनी राज्यातील मंत्र्यांवरसुद्धा गंभीर आरोप केले.

दरम्यान, राज्य सराकारने मोफत लसीकरणाची घोषणा केल्यानंतर राज्यातून सर्व स्तरातून या निर्णायाचे स्वागत केले आहे. मोफत लसीकरणाची अधिकृतपणे घोषणा झालेली नसली तरी तसे मंत्र्यांनी संकेत दिल्यामुळे हा निर्णय जवळजवळ झाल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर सदाभाऊ खोत यांनी केलेल्या वरील टिप्पणीनंतर राज्यात खळबळ ऊडाली आहे.

इतर बातम्या :

Maharashtra Coronavirus Live Update: उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे 569 नवे रुग्ण, 807 जणांना डिस्चार्ज

Maharashtra Corona Update | मोठी बातमी ! राज्यात नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या घटली, पण मृतांच्या संख्येत मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची काय स्थिती ?

इराकमध्ये हाहा:कार ! ऑक्सिजनचा सिलेंडर फुटल्याने मोठा स्फोट, 82 जणांचा होरपळून मृत्यू, 100 पेक्षा जास्त जखमी

(Sadabhau Khot criticizes Maharashtra government and Sharad Pawar on Corona and Corona vaccination drive)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.