रत्नागिरी : राज्यात सध्या हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्दा राजकारणात ठिणग्या उडवत आहे. आधीच मनसेच्या औरंगाबादेतल्या सभेने (Raj Thackeray Aurangabad) राजकारणाचा पार चढवला असताना आता माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतांनी थेट हिंदुत्वावरून शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांना (Cm Uddhav Thackeray) फटकारलंय. शिवसेनेने जे कडवं हिंदुत्व धारण केलेलं होतं, ते मुख्यमंत्र्यांचं कडवं हिंदुत्व राहिलेलं नाही. मुख्यमंत्री आता हिरवा शालू पांघरलेल्यांच्या बरोबर त्यांचा पदर डोक्यावर घेऊन सत्तेच्या खुर्चीवर बसलेला आहात, तुमचं हिंदुत्व नामोहरम झालेलं आहे अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केलीय. त्यामुळे आता शिवसेना नेत्यांकडून यावर जोरदार प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. गेल्या अडीच वर्षांपासून याच मुद्यावर शिवसेनेवर जोरदार टीका होत आहे. भाजप नेतेही वारंवार हिंदुत्वावरून शिवसेनेला डिवचत आहे. शिवसेनाही विरोधकांवर त्याच आक्रमकतेने पलटवार करत आहे. मात्र सध्या राजकारणात एकच मुद्दा गाजतोय. तो म्हणजे हिंदूत्व.
सदाभाऊ खोत यांनी पुन्हा सरकारविरोधात जोरदार एल्गार पुकारला आहे. जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा अभियानाचा रत्नागिरी जिल्ह्यात सुरवात झाली. आज या अभियानाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान राज ठाकरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भट्टीतून ते तयार झालेलं रसायन आहे. हिंदुत्वाला फुंकर घालण्याचा काम राज ठाकरे यांनी केलं आहे, त्याच्या आता ज्वाला भडकलेल्या आहेत. या ज्वालांमध्ये कोणकोण भस्म होतं, हे भविष्यात आपल्याला पाहायला मिळेल,असंही सदाभाऊ यावेळी म्हणाले, तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या सभेची औरंगाबादेत जोरदार तयारी सुरू आहे. काही दिवसातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही मराठवाड्यात सभा घेणार असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे आता राजकारणाचा पारा चांगलाच चढला आहे.
गेल्या लोकसभेमध्ये लाव रे तो व्हिडिओ असं म्हटलं की राष्ट्रवादीचे सगळे नेते हे टाळ्या वाजवत होते, आणि आज तेच राज ठाकरे हिंदुत्वाची शाल पांघरून हिंदुत्वाची भूमिका घेतल्याबरोबर स्टेजवरची टाळ्या वाजवणारी राष्ट्रवादीची रस्त्यावर उतरून टाळ्या वाजवत फिरायला लागलेल्याची बोचरी टिका सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीवर केलीय. तर मख्यमंत्र्यांनी विरोधकांवर तुटून पडा असं सांगणाऱ्या मुख्यमंत्र्याचा समाचार देखिल सदाभाऊ खोत यांनी घेतला. शुक्रवारीही सदाभाऊ खोत यांनी सिंधुदुर्गातून राष्ट्रवादीला टार्गेट केले होते. राष्ट्रवादीने लुटावं कसे हे शिवकवण्यासाठी एक विद्यापीठ खोलावं, जगभरात लोक या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी येतील, असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला होता.