आमदारांना घर देण्याऐवजी फुटपाथवर झोपणाऱ्यांना द्या, सदाभाऊंची परखड फेसबुक पोस्ट

आमदारांसाठी मुंबईत घरं बांधण्यात (Home For Mla In Mumbai) येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यानी (Cm Uddhav Thackeray) केल्यापासून त्यावर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत.

आमदारांना घर देण्याऐवजी फुटपाथवर झोपणाऱ्यांना द्या, सदाभाऊंची परखड फेसबुक पोस्ट
सदाभाऊ खोत यांची फेसबुक पोस्टImage Credit source: facebook
Follow us
| Updated on: Mar 27, 2022 | 3:40 PM

मुंबई : आमदारांसाठी मुंबईत घरं बांधण्यात (Home For Mla In Mumbai) येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यानी (Cm Uddhav Thackeray) केल्यापासून त्यावर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्रात 288 आमदार आहेत. त्यापैकी एडीआरच्या आकडेवारीनुसार तब्बल 266 जण कोट्याधीश आहेत. काँग्रेसचे 96 टक्के आमदार कोट्याधीश आहेत. भाजपचे 95 टक्के आमदार कोट्याधीश आहेत, शिवसेनेचे 93 टक्के आमदार कोट्याधीश आहेत आणि राष्ट्रवादीचे 89 टक्के आमदार कोट्याधीश आहेत. त्यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही आमदारांनी या घोषणेचं स्वागत केलं आहे. तर काही आमदारांनी मात्र या घरांना विरोध केला आहे. त्यावरून आता सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी एक फोटो ट्विट करत सरकारने गरजुंना घरे द्यावीत अशी मागणी केली आहे. सदाभाऊ खोत यांनी फुटपाथवर झोपणाऱ्या लोकांचा एक फोटो ट्विट करत सरकारला जणू आरसाच दाखवला आहे.

सदाभाऊ खोत यांची फेसबुक पोस्ट

सदाभाऊ खोत यांची मागणी काय?

सदाभाऊ खोत यांनी एक फेसबूक पोस्ट लिहीत, परळला टाटा हॉस्पिटला कॅन्सर ट्रीटमेंटसाठी सबंध भारतातून लोकं येतात! ट्रीटमेंट तीन – तीन महिने चालते. अशामध्ये नातेवाईक आणि रुग्णाला राहण्याची गैरसोय होते. अक्षरशः फुटपाथ वर त्यांना तीन – तीन महिने रहाव लागते. मी सरकारला विनंती करेल की, आपण आमदारांना घरे देण्याऐवजी या गरजू व्यक्तींना घरे उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे. अशी पोस्ट खोत यांनी केलीय.

सरकार निर्णय बदलणार का?

मात्र जितेंद्र आव्हाडांनी आमदारांना मोफत घरं देण्याचा निर्णय झालेला नाही., तर त्यांच्याकडून खर्च वसूल केला जाणार असल्याच म्हटलंय. शिवाय ज्या आमदारांची घरं मुंबईत घरं आहेत. त्यांना घरं मिळणार नसल्याचं म्हटलंय. मात्र दुसरीकडे आपण आणि सदाभाऊ खोतांसारखे काही लोक सोडली, तर प्रत्येक आमदाराचे मुंबईत चार-चार घरं असल्याचा दावा चंद्रकांत पाटलांनी केलाय. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी मला सरकारी घर नको, अशी भूमिका घेतली. त्यांच्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होतंय. तसंच मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनीही अशीच भूमिका घेतली आहे. या दोघांच्याची विधानाचं सध्या सर्वसामान्यांकडून स्वागत होतंय. त्यामुळे सरकार या निर्णयात बदल करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Video | मला इथं White Houseमध्ये आल्यासारखं वाटतं, सिम्बॉयसिसमध्ये नितीन गडकरी असं का म्हणाले?

Video : मी तिजोरी नाही उघडली तर काय देणार “घंटा”? अजित पवारांची गाडी पुन्हा घसरली, मान्यही केलं

काही नेते जात्यात, काही नेते सुपात, तर काहींचं पीठ झालं, चंद्रकांत पाटलांकडून डायरीच्या चौकशीचीही मागणी

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.