साई भक्तांना शिर्डीत ऑनलाइन पासची सक्ती, 10 वर्षांखालील मुलांना दर्शन मनाई, भाविकांमध्ये रोष!
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर रुग्ण कमी झाले आहेत. सरकारने निर्बंध हटवले आहेत. हे पाहता, संस्थानेही योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
शिर्डीः कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर 7 ऑक्टोबर रोजी शिर्डीत साईबाबांचे मंदिर भाविकांना खुले झाले. त्यामुळे अनेक दिवसांपासुन साई दर्शनासाठी आतुरतेने वाट पाहणा-या भाविकांना आनंद झाला. मात्र, संस्थान प्रशासनाच्या नियमांमुळे आता त्यांच्यामध्ये रोष वाढत आहे. साईंच्या दर्शनासाठी केलेली ऑनलाइन पासची सक्ती, दहा वर्षांखालील लहान मुलांना केलेली दर्शन मनाई, यामुळे भाविकांमध्ये तीव्र असंतोष आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर रुग्ण कमी झाले आहेत. सरकारने निर्बंध हटवले आहेत. हे पाहता, संस्थानेही योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
ऑनलाइन पासमध्ये अडचणी
साई मंदिरात दर्शनासाठी जाणा-या भाविकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ऑनलाइन पास बुक करताना अनेक अडथळे येत आहेत. खरे तर राज्य सरकारने 65 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना दर्शनासाठी परवानगी दिली आहे. त्याची अंमलबजावणी साईबाबा संस्थानने केली. मात्र, अद्याप 10 वर्षाखालील मुलांसाठी दर्शनाची बंदी कायम ठेवली आहे. साईंच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. मात्र, इथे आल्यानंतर त्यांना मुलांसह दर्शन रांगेबाहेर थांबावे लात आहे. या अटीमुळे एकाच कुटुंबातील काही जणांना दर्शन मिळते, तर काहींना दर्शन न घेता माघारी परतावे लागत आहे. त्याबद्दल भाविकांमध्ये संताप आहे.
प्रसादालयही खुले नाही
मंदिर प्रशासनाने दीपावलीच्या सुट्टयांमध्ये ऑफलाइन दर्शन तसेच साई प्रसादालय खुले करण्याचा मानस व्यक्त केला होता. मात्र, अद्याप त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. ऑनलाइन पासच्या नावाखाली शिर्डीत एजंटाकडून फसवणूक होत असल्याचे भाविक म्हणत आहेत. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर सरकारने सारे निर्बंध शिथिल केले आहेत. अनेक जण पर्यटन आणि देवदर्शनासाठी बाहेर पडत आहेत. शिर्डीमध्येही भाविकांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. हे पाहता संस्थाननेही निर्बंधात शिथिलता आणावी अशी मागणी होत आहे.
कारभार तदर्थ समितीकडे
शिर्डी साईबाबा संस्थानचा कारभार तदर्थ समितीकडे असून, जिल्हा न्यायाधीश अध्यक्ष तर महसूल उपायुक्त , सहधर्मादाय आयुक्त आणि संस्थानच्या कार्यकारी अधिकारी यांचा यात समावेश आहे. अगोदरच कामाचा व्याप असल्याने तदर्थ समितीतील सदस्यांना वेळ मिळत नाही. त्यात भाविकांना दर्शनात अडचणी येत आहेत. यावर नूतन विश्वस्त मंडळाचे अधिकार गोठवल्याने त्यांनाही कारभार पाहणे तांत्रिक दृष्टया जमत नाही. हे पाहता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी वेळीच उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
Health Care : फळे खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक, वाचा अधिक!https://t.co/utzB0ZkKLN | #Healthcare | #Water | #dangerous | #Healthcaretips | #lifestyle |
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 15, 2021
इतर बातम्याः