मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त अन्नधान्यावर सेल 

तर इतर अन्नधान्यांवरील 2 रुपये कमी करण्यात आलेत. यात धान्य व्यापाऱ्यांच्या वतीने जवळपास 2 हजार टन धान्य विकण्याचा संकल्प करण्यात आल्याची माहिती ग्रोमा सचिव अमृतलाल जैन यांनी दिली.

मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त अन्नधान्यावर सेल 
namo sale
Follow us
| Updated on: Sep 17, 2021 | 3:46 PM

नवी मुंबईः मुंबई एपीएमसी मार्केटमधील धान्य बाजारात आज नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त “नमो सेल” नावाने डाळीचे व्यापाऱ्यांनी सवलतीच्या दरात अन्नधान्याची विक्री ठेवलीय. या ठिकाणी विविध प्रकारच्या तांदूळ व डाळींवर किलोमागे 2 रुपयांपर्यंत सवलत देण्यात येत आहे. मूगडाळ 85 रुपयांवरून 83 रुपये, तूरडाळ 90 रुपयांवरून 88 रुपये, मसूर 85 रुपयांवरून ते 83 रुपये, उडीद डाळ 85 रुपयांवरून 83 रुपये तर चणाडाळ 65 रुपयांवरून 63 रुपये विकली जात आहे. तर इतर अन्नधान्यांवरील 2 रुपये कमी करण्यात आलेत. यात धान्य व्यापाऱ्यांच्या वतीने जवळपास 2 हजार टन धान्य विकण्याचा संकल्प करण्यात आल्याची माहिती ग्रोमा सचिव अमृतलाल जैन यांनी दिली.

स्वेच्छेने सर्वच अन्नधान्याच्या वस्तूंवर सवलत

केंद्र सरकार आणि राज्य सरकारपासून सामान्य ग्राहकांपर्यंत डाळींबाबत नेहमीच चर्चा होत असते. तर डाळीचे दर त्यांची साठवणूक तसेच तुटवडा आणि मागणी याबाबत सातत्याने अनेक जण लक्ष देऊन असतात. डाळींची आवक, डाळींच्या साठ्यावरील निर्बंध यावर देखील नियमित खलबते सुरू असतात. मात्र, आज वेगळा विषय ग्राहकांना अनुभवायला मिळत असून, धान्य मार्केटमध्ये अनेक व्यापाऱ्यांनी स्वेच्छेने सर्वच अन्नधान्याच्या वस्तूंवर सवलत ठेवली आहे.

एपीएमसीवर गुन्हेगारी टोळ्यांचेही लक्ष

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वर्षाला जवळपास 10 हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. इथे 1 लाख नागरिकांना प्रत्यक्ष आणि 5 लाख नागरिकांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला आहे. देशाच्या प्रत्येक राज्यातून आणि विदेशातून कृषी माल या मार्केटमध्ये विक्रीसाठी येतो. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख आणि रोज होणारी करोडो रुपयांची उलाढाल यामुळे एपीएमसीवर गुन्हेगारी टोळ्यांचेही लक्ष असते. नवी मुंबईमध्ये गांजा आणि गुटखा विक्रीचे सर्वात मोठे रॅकेट मार्केटमध्ये सुरु आहे.

बाजार समितीची सुरक्षा रामभरोसे

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये अनेक राज्यातील कामगार येऊन राहतात. त्यांची कोणतीच नोंद संबंधित प्रशासनाकडे नाही. सीसीटीव्ही असून सुद्धा ते काम करत नसल्याने गुन्हेगारांना पकडण्यास पोलिसांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे मुंबई बाजार समितीची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे.

फळ आणि भाजी मार्केटला धर्मशाळेचे स्वरुप

एपीएमसी पोलिसांनी वारंवार पत्र व्यवहार करुन सुद्धा याबाबत व्यापारी अथवा प्रशासन माहिती पुरवत नसल्याचे सांगण्यात येत आहे. चोरी, खून, दरोडे, बनावट नोटा व इतर गंभीर गुन्ह्यांमधील आरोपींना अनेकवेळा मार्केटमधून अटक केली आहे. बाजार समितीच्या फळ आणि भाजी मार्केटला धर्मशाळेचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

संबंधित बातम्या

नवी मुंबईत सुरक्षा व्यवस्थेचा बट्ट्याबोळ, बच्चे कंपनींसाठी कृत्रिम तलाव झाला स्विमिंग पूल

शामकांत नाईकांच्या हत्येचा तपास योग्य दिशेने व्हावा, मुलाचे नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे निवेदन

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.