गोवंडीतील उद्यानाला टिपू सुल्तानचे नाव देण्याची मागणी, नगरसेविकेच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

हिंदू जनजागृती समिती आणि इतर काही हिंदुत्ववादी संघटनांनी महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेतली. गोवंडीतील उद्यानाला टिपू सुल्तान याचे नाव देण्यास त्यांनी लेखी निवेदनाद्वारे तीव्र विरोध दर्शवला आहे.

गोवंडीतील उद्यानाला टिपू सुल्तानचे नाव देण्याची मागणी, नगरसेविकेच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
रुक्साना नाझिम सिद्दीकी (उजवीकडे)
Follow us
| Updated on: Jul 15, 2021 | 1:07 PM

मुंबई : गोवंडीतील महापालिकेच्या उद्यानाला टिपू सुलतान (Tipu Sultan) याचे नाव देण्याची मागणी समाजवादी पक्षाच्या नगरसेविकेने केली होती. या मागणीला पालिका प्रशासनाने सकारात्मकता दर्शवली आहे. त्यानंतर हिंदू जनजागृती समितीसह अन्य काही हिंदुत्ववादी संघटनांनी महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांची भेट घेतली. उद्यानाला टिपू सुल्तानचे नाव देण्यास लिखित निवेदनाद्वारे तीव्र विरोध दर्शवला आहे.

कोणी केली मागणी?

समाजवादी पक्षाच्या नगरसेविका रुक्साना सिद्दीकी (Rukhsana Nazim Siddiqui) यांनी या संदर्भात मागणी केली होती. त्या मुंबई महापालिकेच्या पूर्व उपनगरातील ‘एम/पूर्व’ विभागातील प्रभाग क्र. 136 मधून नगरसेविका आहेत. प्रभागातील साहीनाका डम्पिंग रोड येथील पालिका उद्यानाला टिपू सुलतान याचे नाव देण्याबाबत रुक्साना सिद्दीकी यांनी मागणी केली होती.

हिंदुत्ववादी संघटना महापौरांच्या भेटीला

पालिका प्रशासनाने त्यांच्या मागणीला सकारात्मकता दर्शवत हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र हिंदू जनजागृती समिती आणि इतर काही हिंदुत्ववादी संघटनांनी महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेतली. संबंधित उद्यानाला टिपू सुल्तान याचे नाव देण्यास त्यांनी लेखी निवेदनाद्वारे तीव्र विरोध दर्शवला आहे.

हिंदुत्ववादी संघटनांचे म्हणणे काय?

या उद्यानाला अन्य राष्ट्रपुरुषाचे नाव द्यावे, अन्यथा हिंदू समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी पालिकेला दिला आहे. या संदर्भातील विषय गुरुवारी (आज) होणाऱ्या बाजार आणि उद्यान समितीच्या बैठकीसाठी सादर करण्यात आलेला आहे.

महापौर काय म्हणाल्या?

टिपू सुलतान याचे मुंबईसाठी योगदान काय? याविषयी प्रशासकीय नियमांची पडताळणी करून मी लक्ष घालते, असे आश्वासन महापौर किशोरी पेडणेकर यांनी हिंदुत्ववादी संघटनांना दिले आहे.

संबंधित बातम्या :

देशातील डेल्टा प्लसच्या रुग्णांची संख्या 70 च्या आसपास, मुंबई महापालिका तिसऱ्या लाटेसाठी तयार: किशोरी पेडणेकर

तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिका सज्ज, खर्च वाया गेला तरी चालेल पण यंत्रणा तशाच उभ्या राहतील: किशोरी पेडणेकर

(Samajwadi Party Corporator Rukhsana Nazim Siddiqui demands Gowandi BMC Garden to name after Tipu Sultan)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.