महाविकास आघाडीत महाभूकंप… समाजवादी पार्टी आघाडीतून बाहेर पडणार?; गंभीर आरोप काय?

Samajwadi Party Exit From Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीत महाभूकंप... समाजवादी पार्टी आघाडीतून बाहेर पडणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. सपाचे आमदार अबु आझमी यांनी ही घोषणा केली आहे. त्यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केलेत. गंभीर आरोप काय? वाचा सविस्तर...

महाविकास आघाडीत महाभूकंप... समाजवादी पार्टी आघाडीतून बाहेर पडणार?; गंभीर आरोप काय?
अबु आझमी, आमदार, सपाImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Dec 07, 2024 | 2:06 PM

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला. त्यानंतर आता महाविकास आघाडीतील मित्र पक्षाने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. विधिमंडळाचं विशेष अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असणाऱ्या समाजवादी पार्टीने साथ सोडली आहे. शिवाजीनगर- मानखुर्द विधानसभा मतदारसंघाचे आमदार अबू असीम आझमी यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना ही घोषणा केली आहे. तसंच यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव का झाला? यावरही अबू आझमी यांनी प्रकाश टाकला आहे.

अबु आझमी काय म्हणाले?

महाविकास आघाडीमध्ये समन्वय नव्हता. कोणत्याही प्रकारचा समन्वय महाविकास आघाडीमध्ये या निवडणुकीत पाहायला मिळाल नाही. कोणत्याही निवडणुकीला आघाडी म्हणून सामोरं जात असताना एकवाक्यता गरजेची आहे. कोणत्याही पक्षाचा नेता निवडणूक लढत असेल तर त्याला आपला नेता- उमेदवार समजलं गेलं पाहिजे. पण कोणत्याही प्रकारचा समन्वय नव्हता, असं अबब आझमी म्हणालेत.

यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी पराभूत का झाली? यावर आझमी यांनी भाष्य केलं. महाविकास आघाडीचे नेते एकमेकांच्या उमेदवारांच्या मंचावर प्रचारासाठी दिसले नाहीत. खूप कमी वेळा हे चित्र पाहायला मिळालं. जागा वाटपावेळी रस्सीखेच पाहायला मिळाली. याचमुळे महाविकास आघाडीचा पराभव झाला, असं अबू आझमी यांनी सांगितलं.

अबू आझमी यांनी शिवसेनेच्या आणि विशेष करून उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. विधानसभेची निवडणूक हारल्यानंतर त्यांनी असं म्हटलं की आमचा हिंदुत्वाचा मुद्दा कायनम असेल. सगळ्या धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालण्याचा विचार उद्धव ठाकरे यांनी मांडला नाही. त्यामुळे आमचा त्या भूमिकेला विरोध आहे. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ठरवायचं की त्यांना शिवसेनेसोबत राहायचं की नाही, असं अबू आझमी म्हणाले आहेत.

अबु आझमी यांनी घेतली आमदारकीची शपथ

विधानसभा निवडणुकीतील निकालावर महाविकास आघाडीकडून संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांनी आमदारकीची शपथ घेतली नाही. पण अबू आझमी यांनी मात्र विधानसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत आता फूट पडली आहे. अबू आझमी आणि भिवंडी पूर्व मतदारसंघाचे आमदार रईस शेख हे महाविकास आघाडीतून बाहेर पडल्याने महाविकास आघाडीचं संख्याबळ 2 ने कमी झालं आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.