मविआकडून सपाची दोन जागांवर बोळवण, तर सहा जागांवर उमेदवार आमने-सामने
महाविकास आघाडीत समाजवादी पक्षाला दोन जागा सोण्यात आल्या आहेत. शिवाजीनगर -मानखुर्द आणि भिवंडी पूर्व मतदारसंघ हे महाविकास आघाडीनं सपाला सोडले आहेत.
महाराष्ट्रात विधानसभेचं बिगूल वाजलं आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. येत्या वीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. दरम्यान त्यापूर्वी महाविकास आघाडीच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीत समाजवादी पक्षाला दोन जागा सोण्यात आल्या आहेत. शिवाजीनगर -मानखुर्द आणि भिवंडी पूर्व मतदारसंघ हे महाविकास आघाडीनं सपाला सोडले आहेत.
तर समाजवादी पक्ष हा महाविकास आघाडीत राहून सहा विधानसभा मतदारसंघात मौत्रीपूर्ण लढत लढणार आहे. भिवंडी पश्चिम, धुळे शहर, मालेगाव शहर,औरंगाबाद पूर्व, तुळजापूर, भूम-परंडा या मतदार संघात समाजवादी पक्ष हा मावीआच्या उमेदवारांसोबत मैत्रीपूर्ण लढत लढणार आहे. दरम्यान महाविकास आघाडीसोबत आता आणखी एक पक्ष आला आहे. समाजवादी पक्षामुळे महाविकास आघाडीला निवडणुकीत किती जागांवर फायदा होऊ शकतो हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
बंडखोरांमुळे टेन्शन वाढलं
दरम्यान दुसरीकडे आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. बंडखोरांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी शेवटपर्यंत महाविकास आघाडी आणि महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न सुरू होता. मात्र अनेकांनी आपाला उमेदवारी अर्ज कायम ठेवाला आहे. त्यांमुळे अनेक मतदारसंघात आता तिरंगी आणि चौरंगी लढत होणार असल्याचं पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीत अनेक मतदारसंघात बिघाडी झाल्याचं चित्र आहे. बंडखोर उमेदवारांमुळे अधिकृत उमेदवारांची डोकदुखी वाढण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे आता सपा देखील महाविकास आघाडीसोबत आला आहे, महाविकास आघाडीकडून सपासाठी दोन जागा सोडण्यात आल्या आहेत. मात्र सहा जागांवर सपाचे उमेदवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. त्याचा फटका हा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बसणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.