“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याचेही उत्तर द्यायला हवे”, ठाकरे गटाच्या खासदाराचा संताप, म्हणाले “तो निर्णय…”

पंतप्रधानपदावरील माणसाला असे वागणे व बोलणे शोभत नाही. मोदींना भाषणे लिहून देणाऱ्यांनी हे पथ्य पाळायला हवे. अंधभक्तांना टाळ्या वाजवायला काय जाते? असा सवालही त्यांनी विचारला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याचेही उत्तर द्यायला हवे, ठाकरे गटाच्या खासदाराचा संताप, म्हणाले तो निर्णय...
Image Credit source: ANI
Follow us
| Updated on: Oct 07, 2024 | 8:34 AM

Sanjay Raut On PM Narendra Modi : लाडकी बहीण योजनेवर झारखंडला जाऊन टीका करायची व महाराष्ट्रात येऊन त्याच राजकीय योजनेचे कौतुक करायचे. पंतप्रधानपदावरील माणसाला असे वागणे व बोलणे शोभत नाही. मोदींना भाषणे लिहून देणाऱ्यांनी हे पथ्य पाळायला हवे. अंधभक्तांना टाळ्या वाजवायला काय जाते? पण पंतप्रधानांचे हसे होते, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला. ‘सामना’च्या अग्रलेखातून ही टीका करण्यात आली.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वृत्तपत्राच्या अग्रलेखातून संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. युवा वर्गाला व्यसनाच्या नादी लावून आलेल्या पैशांमधून काँग्रेसला निवडणुका लढवायच्या आहेत. पंतप्रधान मोदी यांचे हे वक्तव्य गंभीर आहे व या प्रकरणाचा खोलात जाऊन तपास व्हायलाच हवा. पंतप्रधानांना देशातील युवकांच्या व्यसनाधीनतेची चिंता आहे हे ऐकून बरे वाटले, पण तरुण वैफल्यग्रस्त होऊन व्यसनाधीन का बनत आहे? याचे उत्तरही पंतप्रधानांनी द्यायला हवे, असे संजय राऊत म्हणाले.

सामना अग्रलेखात नेमकं काय?

“पंतप्रधान मोदी यांची भाषणे कोण लिहून देत आहेत? हे तपासून घेण्याची वेळ आली आहे. एकतर मोदी यांच्या भाषणात खोटेपणा व ढोंग ठासून भरलेले असते व अनेकदा पंतप्रधानांना विस्मृतीचा आजार जडला आहे काय? अशी शंका त्यांची भाषणे ऐकून किंवा वाचून वाटते. पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणांचा संग्रह प्रसिद्ध केला तर त्या संग्रहाचे नाव ‘मी नाही त्यातली’ असेच काहीसे ठेवावे लागेल. पंतप्रधान दोन दिवस महाराष्ट्रात होते. त्यांनी अनेक भाषणे केली, पण त्यांच्या बोलण्यात ताळमेळ नव्हता. अकोल्यातील सभेत त्यांनी सांगितले की, अमली पदार्थांच्या पैशांतून काँग्रेस निवडणूक लढवत आहे. दिल्लीत हजारो कोटींचे अमली पदार्थ पकडण्यात आले. त्या प्रकरणी मुख्य आरोपी काँग्रेसचा एक नेता आहे. युवा वर्गाला व्यसनाच्या नादी लावून आलेल्या पैशांमधून काँग्रेसला निवडणुका लढवायच्या आहेत. पंतप्रधान मोदी यांचे हे वक्तव्य गंभीर आहे व या प्रकरणाचा खोलात जाऊन तपास व्हायलाच हवा”, असे संजय राऊत म्हणाले.

“यास ढोंग नाही तर काय म्हणायचे?”

“पंतप्रधानांना देशातील युवकांच्या व्यसनाधीनतेची चिंता आहे हे ऐकून बरे वाटले, पण तरुण वैफल्यग्रस्त होऊन व्यसनाधीन का बनत आहे? याचे उत्तरही पंतप्रधानांनी द्यायला हवे. मोदी यांनी दिल्लीत पकडलेल्या अमली पदार्थांचा काँग्रेसशी संबंध जोडला, पण मोदी-शहांच्या गुजरातमधील मुंद्रा पोर्टवर गेल्या पाच वर्षांत आठ ते दहा वेळा तीन लाख कोटींचे अमली पदार्थ पकडले गेले. हा साठा अफगाणिस्तानसारख्या देशातून आला. जेथे मोदी-शहांचे तटबंदी असलेले राज्य आहे, त्या बंदरावर केंद्राची सुरक्षा व्यवस्था आहे. तेथे वारंवार लाखो कोटींचे अमली पदार्थ उतरवले जातात. हे कसे घडते? या मुंद्रा बंदराचे मालक दुसरे तिसरे कोणी नसून मोदी-शहांचे लाडके गौतमभाई अदानी आहेत”, असा घणाघात संजय राऊतांनी केला.

“मिंधे सरकारमधील एक मंत्री संजय राठोड मोदींच्या चरणाशी बसले होते. या महाशयांवर खून, विनयभंग, बळजबरी असे आरोप पूजा चव्हाण या तरुणीने केले व एक दिवस तिने आत्महत्या केली. ही नक्की हत्या की आत्महत्या, हे रहस्य आहे. देवेंद्र फडणवीस वगैरे लोकांनी त्या वेळी या राठोडना केली होती. राठोड यांचे त्या तरुणीकडे जाणे-येणे होते, असे आरोपही तेव्हा झाले होते. त्या महिलेच्या घरात नशेचे अनेक साहित्य मिळाले व तेच महाशय मंत्री म्हणून काल मोदींच्या चरणाशी बसले. यास ढोंग नाही तर काय म्हणायचे?” असा सवाल संजय राऊतांनी केला.

मोदी शुद्धीत आहेत ना?

“मोदी यांना मागचे आठवत नाही व पुढचे दिसत नाही. लाडकी बहीण योजनेवर झारखंडला जाऊन टीका करायची व महाराष्ट्रात येऊन त्याच राजकीय योजनेचे कौतुक करायचे. पंतप्रधानपदावरील माणसाला असे वागणे व बोलणे शोभत नाही. मोदींना भाषणे लिहून देणाऱ्यांनी हे पथ्य पाळायला हवे. अंधभक्तांना टाळ्या वाजवायला काय जाते? पण पंतप्रधानांचे हसे होते. अमली पदार्थांबाबत मोदींची विधाने ही अशीच हास्यास्पद ठरली आहेत. नोटाबंदी केल्यावर अमली पदार्थांची तस्करी थांबेल, असे मोदी म्हणाले होते. उलट ती तस्करी जास्तच वाढली आहे. नोटाबंदीचा निर्णय ज्या कोणी मोदींना घ्यायला लावला ते एकतर गांजा किंवा चिलमीच्या नशेत असावेत, नाहीतर तरुणांना व्यसनाधीनतेच्या जाळ्यात ढकलणारा हा निर्णय झालाच नसता. मोदींचे वागणे, बोलणे आणि त्यांची भाषणे सध्या चेष्टेचा विषय बनली आहेत. महाराष्ट्रातील त्यांच्या दौऱ्यातील भाषणांबाबतही तेच घडले. त्यामुळे मोदी शुद्धीत आहेत ना? असा प्रश्न पडतो”, असे संजय राऊतांनी म्हटले.

संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.