Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संभाजी भिडेंना चावलेल्या कुत्र्याची एसआयटी चौकशी करा, वडेट्टीवारांचा टोला

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेवर विरोधकांनी टीका केली असून, विजय वडेट्टीवार यांनी SIT चौकशीची मागणी केली आहे.

संभाजी भिडेंना चावलेल्या कुत्र्याची एसआयटी चौकशी करा, वडेट्टीवारांचा टोला
sambhaji bhide Vijay WadettiwarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 15, 2025 | 5:37 PM

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेत संभाजी भिडे हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुत्र्याने चावा घेतल्यानंतर संभाजी भिडेंना डॉक्टरांकडून दोन इंजेक्शन देण्यात आले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. आता या घटनेनंतर आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संभाजी भिडेंवर उपरोधिक टीका केली आहे.

विजय वडेट्टीवार यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना संभाजी भिडेंवर झालेल्या कुत्र्‍याच्या हल्ल्यावर विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी भाष्य केले. संभाजी भिडे यांना चावणाऱ्या कुत्र्याची SIT चौकशी करा, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

“काय त्या कुत्र्याला दुर्बुद्धी सुचली. कुणाला चावावं हे कुत्र्याला कळलं नाही याचं वाईट वाटतं. पोलीस नक्की कुत्रा शोधत आहे, याची अजून माहिती मिळालेली नाही. मी माहिती घेतो. कुत्रा हा प्रामाणिक प्राणी असतो, मात्र या प्रामाणिक प्राण्याने का असा राग धरला यासंदर्भात एसआयटी लावून चौकशी केली पाहिजे”, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

जितेंद्र आव्हाडांचा टोला

“कुत्रा कोणाला चावल्याशिवाय आणि तोही महत्त्वाच्या माणसाला चावल्याशिवाय कुत्रे काही उचलले जात नाहीत. आता महत्त्वाच्या माणसाला चावावेत अशी आपण देवाकडे प्रार्थना करुया म्हणजे सर्वसामान्यांना न्याय मिळेल. या सरकारमध्ये कुत्राही मोठ्या माणसाला चावला तरच सापडतो. या सरकारची कार्य करण्याची पद्धत योग्य आहे”, असा टोला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.

नेमकं काय घडलं?

संभाजी भिडे यांच्यावर कुत्र्‍याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. काल रात्री उशिरा कार्यक्रम संपवून घरी जात असताना भिडे गुरुजींवर एका भटक्या कुत्र्याने हल्ला केला. यावेळी त्या कुत्र्‍याने त्यांच्या पायाचा चावा घेतला. सांगली शहरातील माळी गल्ली या ठिकाणी ही घटना घडली. यानंतर जखमी झालेल्या भिडे गुरूजींना तात्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेनंतर संभाजी भिडेंना डॉक्टरकडून दोन इंजेक्शन देण्यात आली आहेत. सध्या संभाजी भिडेंची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. संभाजी भिडेंना येत्या दोन दिवसात आणखी इंजेक्शन देण्यात येणार आहेत.

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल.
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय.
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा.
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?.
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?.
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट.
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'.
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला.
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्...
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्....
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं.