राजीनामा देताच संभाजी भिंडेंचा धनंजय मुंडेंना सल्ला म्हणाले….
संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर आता राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे, आज अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे, मुंडेंच्या राजीनाम्यावर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया समोर येत आहेत.

बीड जिल्ह्याच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सरकारकडून सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे, तसेच एसआयटी देखील स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान दोनच दिवसांपूर्वी सीआयडीकडून या प्रकरणात आरोप पत्र दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर सोमवारी संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. आरोपींनी अत्यंत क्रूर पद्धतीनं संतोष देशमुख यांची हत्या केली. हे फोटो व्हायरल होताच राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यानंतर अखेर आज मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला आहे.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर आता विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे गुरुजी यांनी देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे यांच्यासह सर्वच राजकीय नेत्यांना सल्ला दिला आहे. धनंजय मुंडे आणि सगळ्याच राजकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं जीवन चरित्र वाचावं असं भिडे गुरुजी यांनी म्हटलं आहे.
धनंजय मुंडेंचा राजीनामा
संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या प्रकरणात सीआयडीनं आरोप पत्र दाखल केलं आहे. वाल्मिक कराड हाच या प्रकरणातील मास्टरमांईड असल्याचं सीआयडीनं आपल्या आरोप पत्रात म्हटलं आहे. संतोष देशमुख यांनी खंडनीला विरोध केल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली, असं सीआयडीच्या आरोप पत्रात म्हटलं आहे. दरम्यान सीआयडीच्या आरोप पत्रानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील राजीनाम्यासाठी दबाव वाढला होता. त्यातच अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाले. त्यामुळे राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. अखेर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो मंजूर देखील केला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यात तीव्र संतापाची लाट आहे.