Abdul Sattar : जास्त हुशार्या मारू नका, मी पुन्हा येईल, अब्दुल सत्तारांचा विरोधकांना सूचक इशारा
Abdul Sattar Big Statements : अब्दुल सत्तार यांना यावेळी कॅबिनेटमध्ये वर्णी लागली नाही. त्यावरून उलटसुलट चर्चा रंगल्या. सत्तार यांना आता पाच वर्षे आता मंत्रीपद मिळणार नाही, अशा चर्चा रंगल्या आहेत. त्यावर जास्त हुशार्या मारू नका अडीच वर्षानंतर मंत्री म्हणून मी पुन्हा येईल, असा इशारा अब्दुल सत्तारांनी विरोधकांना दिला.
अब्दुल सत्तार यांना यावेळी कॅबिनेटमध्ये वर्णी लागली नाही. त्यावरून उलटसुलट चर्चा रंगल्या. सत्तार यांना आता पाच वर्षे आता मंत्रीपद मिळणार नाही, अशा चर्चा रंगल्या आहेत. त्यावर जास्त हुशार्या मारू नका अडीच वर्षानंतर मंत्री म्हणून मी पुन्हा येईल, असा इशारा शिवसेनेचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तारांनी विरोधकांना दिला आहे.
मंत्रीपद देताना निकष
महायुतीचे सरकार बहुमताने निवडून आले. तीनही घटक पक्षांना भरभरून मतं मिळाली. त्यामुळे काही जुन्या मंत्र्यांना मंत्री पदाची माळ आपल्याच गळ्यात पडेल असे वाटत होते. पण भाजपाप्रमाणेच इतर घटक पक्षांनी सुद्धा मंत्र्यांच्या कामकाजाचे मूल्यांकन केले. तसेच त्यांनी काही वादग्रस्त विधानं केली आहेत का? हा पण निकष लावण्यात आला. त्यात काही जणांना मंत्रिमंडळात पुन्हा स्थान देण्यात आले नाही.
तिघांना शिवसेनेने दिला डच्चू
शिवसेनेने यावेळी दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळात स्थान दिले नाही. त्यावरून एकच काहूर उठले. केसरकर, सावंत यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली. योग्य वेळी भावना व्यक्त करण्याची भूमिका घेतली. तर अनेक दिवसांपासून सत्तार यांनी याविषयावर मन मोकळं केले नव्हते. आता त्यांनी एका सभेत त्यांची बाजू जाहीर केली. त्यांनी विरोधकांच्या आनंदावर पाणी फेरले.
काय म्हणाले सत्तार?
मी चौथ्यांदा विधानसभेत निवडून गेल्यानंतर सिल्लोडला मंत्रीपद मिळेल अशी अनेकांना अपेक्षा होती. मात्र ते मिळालं नाही. राज्यात सर्वच भागाचा समतोल साधावा लागतो. अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरलेला आहे. त्यामुळे आपल्याला मंत्री पदासाठी थांबावं लागलं आहे. त्यामुळे मी नाराज नाही आणि कार्यकर्त्यांनी नाराज राहू नये. तर जास्त हुशार्या मारू नका, मी अडीच वर्षानंतर मंत्री म्हणून मी पुन्हा येईल असा इशारा विरोधकांना अब्दुल सत्तार यांनी या सभेत दिला.
त्यामुळे अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यामध्ये अजून कोण कोण मंत्रिमंडळात येणार, कोणा-कोणाची वर्णी लागणार हे लवकरच समोर येईल. यावेळी मोठ्या संख्येने आमदार निवडून आल्याने सर्वांना न्याय देण्यासाठी ही रीशफल करण्यात आल्याचे सूतोवाच अब्दुल सत्तार यांनी केले आहे. अर्थात त्याला अजून वरिष्ठांनी दुजोरा दिलेला नाही.