भाजपमध्ये गेल्यावर पहिल्याच भाषणात शाहांसमोर सगेसोयऱ्यांचा मुद्द्यावर अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसला रामराम करत भाजपवासी झालेल्या अशोक चव्हाण यांनी अमित शाह यांच्यासमोरच सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. नेमकं काय म्हणाले अशोक चव्हाण जाणून घ्या.

भाजपमध्ये गेल्यावर पहिल्याच भाषणात शाहांसमोर सगेसोयऱ्यांचा मुद्द्यावर अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
Follow us
| Updated on: Mar 05, 2024 | 9:02 PM

संभाजीनगर | केंद्रीय मंत्री अमित शहा दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. जळगावमधील सभेनंतर संभाजीनगरमध्येही दुसरी सभा झाली. यावेळी भाजपमध्ये गेल्यावर पहिल्यांदा भाषण करणाऱ्या अशोक चव्हाण यांनी सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावर केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे, अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह इतरही नेते उपस्थित होते.

अशोक चव्हाण काय म्हणाले?

मराठा समाजाला कायद्याने 10 टक्के आरक्षण दिलं त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले पाहिजेत. आठ वर्षापासून हा प्रश्न अडकला होता तो त्यांनी मार्गी लावला. आता सगेसोयऱ्यांचा मुद्द्यावरही कायदेशीर प्रक्रिया करून लवकरच तेही मार्गी लागणार आहे. विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी अब की बार 400 पार असा नारा देत अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणाची सांगता केली.

…म्हणून मोदींवर टीका केली नाही- अशोक चव्हाण

मी दुसऱ्या पक्षात असातानाही कधी मोदी साहेबांवर टीका केली नाही. कारण जर चांगलं चांललं असेल तर चांगलंच बोललं पाहिजे हे मी या ठिकाणी कबूल करतो. या ठिकाणी रावसाहेब दानवे यांनी वंदे भारत एक्सप्रेस मराठवाड्यात आणण्यासाठी योगदान दिलं. भागवत कराड यांनीही संधीचं सोनं करत योगदान देण्याचं काम केलं असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले.

दरम्यान, जो रोडमॅप मोदींनी दिला त्याने देशामध्ये हायवे झाले, गरीब शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना आणल्या. तीर्थक्षेत्रांचाही मोठ्या प्रमाणात विकास झाला. मेडिकल कॉलेजची संख्या वाढली. विकास हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रत्येक क्षेत्रात झाल्याचं चव्हाणांनी सांगितलं.

पंकजा मुडेंकडून शाहांचं स्वागत

महाराष्ट्रात ज्यांच्या त्यागाने आणि स्वाभिमानी बाणाने पावन, ज्यंच्या नावाने हे माझं नगर अत्यंत स्वाभिमानाने नाव घेतं त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये, ज्यांनी हे नाव देण्यामध्ये आणि देशाला स्वाभिमान देण्यामध्ये मोठं योगदान दिलं, असे कलम 370 रद्द करणारे अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवणारे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिव्य स्वप्न बघून ते पूर्ण करण्यामागे अपार कष्ट करुन स्थिरता देणारे नेते अमित शाह यांचं मी छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वागत करते, असं म्हणत पंकजा मुंडेंनी शाहांचं स्वागत केलं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.