भाजपचे हाल कुत्र्यासारखे…; अंबादास दानवे यांचं वादग्रस्त विधान

Ambadas Danve Controversial About BJP : ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजप पक्षाबाबत बोलताना वादग्रस्त विधान केलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना अंबादास दानवे यांची जीभ घसरली आहे. त्यांच्या विधानाने नवा वाद निर्माण झालाय. वाचा सविस्तर बातमी...

भाजपचे हाल कुत्र्यासारखे...; अंबादास दानवे यांचं वादग्रस्त विधान
अंबादास दानवेImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Nov 12, 2024 | 1:25 PM

कोल्यातील काँग्रेसच्या प्रचारसभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. भाजपला कुत्रा बनवण्याची वेळ आल्याचं नाना पटोले म्हणाले. काँग्रेस उमेदवार साजिदखान पठाण यांच्या प्रचारसभेत नाना पटोलेंचे वक्तव्य. केलं. नाना पटोलेंच्या वक्तव्याने नवा वाद सुरु असतानाच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. काहीही वादग्रस्त विधान नाही योग्य विधान आहे. तशीच स्थिती भाजपची झाली पाहिजे. कुत्र्यासारखे हाल भाजपचे केले पाहिजेत. भाजप जशी वागते तसेच बोलले पाहिजे, असं विधान अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाने नवा वाद निर्माण झाला आहे, असं अंबादास दानवे म्हणालेत.

रावसाहेब दानवेंच्या व्हायरल व्हीडिओवर काय म्हणाले?

भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी अर्जुन खोतकरांचं स्वागत करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रावसाहेब दानवेंनी एका कार्यकर्त्यांला लाथ मारल्याचा हा व्हीडिओ आहे. यावर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विनोदाने पण लाथ मारणं चुकीचं आहे. यातून भारतीय जनता पार्टीची वृत्ती प्रगट होते, असं त्यांनी म्हटलं आहे.

सोयाबीनविषयी देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलन केलं होतं. त्यावेळपेक्षा कमी भाव आता आहे सोयाबीन ठेवावं की फेकून द्यावं अशी परिस्थिती आहे. सोयाबीनमध्ये एक रुपयाचा सुद्धा फायदा होत नाही. याला सरकार जबाबदार आहे. आयात निर्यात धोरण जबाबदार आहे. सोयाबीनचा प्रश्न ज्वलंत आहे कवडीमोल भावाने सोयाबीन घ्यायचं आणि व्यापाऱ्यांचा फायदा करून द्यायचा असं धोरण आहे. त्यामुळे शेतकरी आक्रमक होतील, असं अंबादास दानवे म्हणालेत.

राज ठाकरेंवर निशाणा

राज ठाकरे नेमके कोणाच्या बाजूने आहे हे कळत नाही. भाजपच्या बाजूने की विरोधात हे कळत नाही. भाजपच्या बाजूने म्हटलं तर भाजपच्या मित्रांच्या विरोधात प्रचार करतात. त्यामुळे ते बोलत असतील त्यांच्या त्या शुभकामना समजाव्या. राज ठाकरे पुत्र प्रेमासाठी बोलत असतील. मात्र निवडणुकित जे व्हायचं ते होईल लढलं पाहिजे निवडणूक लढवणं मर्दानगीच लक्षण असतं, असं अंबादास दानवे म्हणालेत.

राहुल गांधी सत्य बोलतायेत. भारतीय जनता पार्टीच्या सहा लोकसभेच्या खासदारांनी संविधान बदलण्याचं वक्तव्य केलं आहे. आताची वृत्ती भाजपची काय आहे. भाजप संविधानाने वागत नाही सगळे कायदे वाकडेतिकडे केले आहेत. संविधानाची पायमल्ली भाजपने केली आहे, असं अंबादास दानवे म्हणालेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.